---Advertisement---

टीम इंडियाबाबतीत सातव्यांदाच घडले असे काही!

---Advertisement---

हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाचा डाव 30.5 षटकात 92 धावांवर रोखला.

भारतीय संघावर वनडेत सातव्यांदा 100 धावांच्या आत डाव संपुष्टात येण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे वनडेत सर्वाधिक वेळा 100 धावांच्या आत डाव संपुष्टात येण्याच्या यादीत भारतीय संघाने न्यूझीलंड संघाची बरोबरी केली आहे.

न्यूझीलंडही 7 वेळा 100 धावांच्या आत वनडेत सर्वबाद झाला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर झिम्बाब्वे असून ते 17 वेळा 100 धावांच्या आत वनडेत सर्वबाद झाले आहेत.

याबरोबरच वनडेत भारतीय संघाला दोन वेळा 100 धावांच्या आत सर्वबाद करण्याचा पराक्रम फक्त श्रीलंका आणि न्यूझीलंड संघाने केला आहे. तसेच 2010 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ 100 धावांच्या आत सर्वबाद झाला आहे. 2010 मध्ये भारताला 88 धावांवर सर्वबाद करण्याचा विक्रम न्यूझीलंड संघानेच केला होता.

#भारताची वनडेतील सर्वाधिक निचांकी धावसंख्या-

54 धावा – विरुद्ध श्रीलंका, 2001

63 धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया,1981

78 धावा – विरुद्ध श्रीलंका, 1986

79 धावा – विरुद्ध पाकिस्तान, 1978

88 धावा – विरुद्ध न्यूझीलंड, 2010

91 धावा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2006

92 धावा – विरुद्ध न्यूझीलंड, 2019

#वनडेत सर्वाधिक वेळा 100 धावांच्या आत सर्वबाद होणारे संघ-

17 – झिम्बाब्वे

16 – बांगलादेश

11 – श्रीलंका

9 – पाकिस्तान

8 – विंडीज

7 – भारत

7 – न्यूझीलंड

6 – इंग्लंड

6 – केनिया

5 – ऑस्ट्रेलिया

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर विराटचा तो विक्रम मोडण्यात रोहित शर्माला आले अपयश

१६ वर्षांनंतर टीम इंडियाने मोडला स्वत:चाच नकोसा असा विक्रम

२०१० नंतर भारतीय संघावर ओढावली अशी नामुष्की

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment