यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) धमाकेदार कामगिरी केली आहे. त्यानं 23 षटकात 11 विकेट्स घेतले आहेत. परंतू यादरम्यान भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी जसप्रीत बुमराहबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी जसप्रीत बुमराहचं भरभरुन कौतुक केलं आहे.
कपिल देव (Kapil Dev) म्हणाले, “जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा 1000 पटीनं चांगला गोलंदाज आहे. हा तरुण खेळाडू आमच्यापेक्षा खूप चांगला आहे, आम्हाला जास्त अनुभव होता, परंतू तो चांगला आहे.” बुमराह सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहे. भारतासाठी 36 कसोटी सामने खेळलेल्या या गोलंदाजानं 159 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं 89 एकदिवसीय सामन्यांमध्ये 149 विकेट्स घेतल्या आहेत आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 85 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी 434 कसोटी विकेट्सच्या विश्वविक्रमासह कारकीर्द संपवली. त्यांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 253 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकला होता. 65 वर्षीय कपिल देव यांनी सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंच्या तंदुरुस्तीचेही कौतुक केले. ते म्हणाले, “खेळाडू खूप चांगले आहेत, उत्कृष्ट आहेत, ते अधिक तंदुरुस्त आहेत, खूप मेहनती आहेत, हुशार आहेत.”
कपिल देवनं 225 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 3783 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्यांची सर्वाेत्कृष्ट धावसंख्या नाबाद 175 राहिली आहे. 131 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात त्यांनी 5248 धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी 8 शतक तर 27 अर्धशतक ठोकले आहेत. कपिल देवच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 शतकं आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“खराब खेळपट्टीमुळे सामना हारलो…” अफगाणिस्तानच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षकाची प्रतिक्रिया
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ‘या’ भारतीय खेळाडूला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी…!
बीसीसीआयचा मोठा निर्णय! तुषार-मयंकसह हे 7 वेगवान गोलंदाज झाले मालामाल