आज(18 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मोहालीमध्ये दुसरा टी20 सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात फलंदाजांच्या फळीत रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, श्रेयस अय्यर यांना संधी मिळाली आहे. तर रिषभ पंत यष्टीरक्षण करेल. त्याचबरोबर हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधूंनाही आज संधी मिळाली आहे. तसेच रविंद्र जडेजाही संघात आहे. गोलंदाजांच्या फळीत वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, दिपक चहर यांचा समावेश आहे.
हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या क्विटॉन डीकॉकचा कर्णधार म्हणून पहिलाच टी20 सामना आहे. या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेचे एन्रीच नॉर्जे, बीजॉर्न फॉर्च्यून आणि तेंबा बावूमा हे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पदार्पण करणार आहेत.
तसेच आत्तापर्यंत भारतीय संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात पहिला टी20 विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारतातील विजयाची मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, नवदीप सैनी
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक/कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, तेंबा बावुमा, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, डेव्हिड मिलर, अॅन्डिले फेहलूक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, बीजॉर्न फॉर्च्यून, कॅगिसो रबाडा, एन्रीच नॉर्जे, तब्राइज शम्सी.
https://twitter.com/BCCI/status/1174311316934103040
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टॉप ५: भारताच्या या खेळाडूंना आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे खास ५ विक्रम करण्याची संधी
–या खास यादीत समावेश होण्यासाठी शिखर धवन केवळ ४४ धावा दूर
–कोहली-स्मिथ कोण आहे सर्वोत्तम फलंदाज? जॉन्टी ऱ्होड्सने घेतले ‘हे’ नाव






