बंगळूरू। पहिलीच कसोटी खेळत असलेल्या अफगाणिस्तानला भारताविरुद्ध दुसऱ्याच दिवशी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने अफगाणिस्तानवर एक डाव 262 धावांनी विजय मिळवला.
याबरोबर भारताने असा काही पराक्रम केला जो अशिया खंडात कोणत्याही संघाला जमला नाही. दुसऱ्याच दिवशी कसोटी सामना जिंकणारा भारत अशिया खंडातील पहिलाच संघ बनला आहे.
यापुर्वी श्रीलंका, पाकिस्तान किंवा बांगलादेशला अशी कामगिरी करता आली नाही. यापुर्वी इंग्लंड (९), आॅस्ट्रेलिया (८), दक्षिण आफ्रिका (२), न्युझीलंड (१) यांनी दोन दिवसांत कसोटी सामना जिंकला आहे.
तसेच एकाच दिवसांत दोन वेळा विरोधी संघाला बाद करणारा भारत न्युझीलंड (२ वेळा ) आणि इंग्लंडनंतर (१ वेळा) तिसरा देश बनला आहे. इंग्लंडने तर भारतालाच दोन वेळा कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बाद केले होते. तर न्युझीलंडने दोन वेळा असा कारनामा करताना झिंबांब्वेला बाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–७ तासांत ९ फलंदाज झाले २ वेळा बाद
–दुसऱ्याच दिवशी पहिली कसोटी खेळणाऱ्या अफगाणिस्तानला भारताचा धोबीपछाड