गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) भारतीय संघाला वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात नजीकच्या पराभवाचा सामना करावा लागला. ब्रायन लारा स्टेडिअम, त्रिनिदाद येथे पार पडलेल्या या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाने 4 धावांनी भारतीय संघाचा पराभवा पराभव केला. अशाप्रकारे 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघ 0-1ने पिछाडीवर पडला. 150 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना पराभूत झाल्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. या नकोशा विक्रमाच्या यादीत एमएस धोनी आणि अजिंक्य रहाणे यांचाही समावेश आहे.
हार्दिक पंड्याचा नकोसा विक्रम
पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिज (West Indies) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला होता. यावेळी वेस्ट इंडिज संंघ प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत फक्त 149 धावाच करू शकला होता. अशात भारतापुढे 150 धावांचे आव्हान होते. मात्र, भारतीय संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावूनही 145 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना वेस्ट इंडिजने 4 धावांनी जिंकला. या पराभवामुळे भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या (Captain Hardik Pandya) याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.
कोणत्याही भारतीय कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळताना संघ 150 पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना पराभव होण्याची ही चौथी वेळ ठरली. या यादीत एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2 वेळा 150 पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना पराभूत झाला होता. तसेच, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताला एक वेळा 150 पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना पराभव पत्करावा लागला होता.
धोनीच्या नेतृत्वाखाली 2 वेळा पराभव
धोनीच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम 2009 साली दक्षिण आफ्रिकेच्या 131 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावत 118 धावाच करू शकला होता. त्यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिकेने 12 धावांनी जिंकला होता. त्यानंतर धोनीच्याच नेतृत्वाखाली 2016मध्ये न्यूझीलंडच्या 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 79 धावसंख्येवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडने 47 धावांनी जिंकला होता.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात एक वेळा पराभव
यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली 2015मध्ये भारतीय संघाला 150 पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना पराभव पत्करावा लागला होता. झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 145 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 135 धावाच केल्या होत्या. त्यामुळे झिम्बाब्वेने हा सामना 10 धावांनी जिंकला होता. (India Losing while Chasing less than 150 Scores under a Captain hardik pandya in the list)
कर्णधाराच्या नेतृत्वाखाली 150पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा पराभव
2 वेळा- एमएस धोनी
1 वेळा- अजिंक्य रहाणे
1 वेळा- हार्दिक पंड्या*
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ स्टार खेळाडूच्या सल्ल्यामुळे विंडीजने केला भारताचा पराभव, पॉवेलने सांगितला तो लाखमोलाचा सल्ला
राष्ट्रगीतावेळी हार्दिक पंड्याच्या डोळ्यात तरळले अश्रू, कर्णधाराने 140 कोटी भारतीयांनाही केलं भावूक