---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ 3 संघांकडे आहेत, सर्वात उत्कृष्ट फिरकीपटू! पाहा यादी

---Advertisement---

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) सुरू होईल. ही स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाणार आहे. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या स्पर्धेमध्ये 8 संघ खेळताना दिसतील. दरम्यान प्रत्येक संघात उत्कृष्ट फिरकीपटूचा समावेश आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण कोणत्या 3 संघांकडे उत्कृष्ट फिरकीपटू आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.

यावेळी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फिरकीपटू खूप चर्चेत असतील. आशियाई खेळपट्ट्यांवर खेळले जाणारे सामने लक्षात घेऊन, सर्व संघ त्यांचे फिरकी विभाग मजबूत करत आहेत. चला तर मग त्या 3 संघांबद्दल आपण जाणून घेऊया.

1) भारत- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy 2025) भारतीय संघ खूप धोकादायक दिसत आहे. भारतीय संघाच्या या ताकदीचे कारण म्हणजे फिरकी गोलंदाजीचा हल्ला. संघातील 15 पैकी 5 खेळाडू फिरकी गोलंदाजी करतात आणि हे सर्व यशस्वी गोलंदाज आहेत.

भारताकडे कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) हे मुख्य फिरकी गोलंदाज आहेत. याशिवाय रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Axar Patel) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हे फिरकी अष्टपैलू खेळाडू आहेत. हे असे फिरकी गोलंदाज आहेत, जे कोणत्याही विरोधी संघाला उद्ध्वस्त करू शकतात. अशा परिस्थितीत, भारतीय संघ या बाबतीत सर्वात मजबूत आहे.

2) अफगाणिस्तान- आशियाई संघांकडे खूप चांगले फिरकी गोलंदाज आहेत. या बाबतीत अफगाणिस्तान संघ आता बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या संघांपेक्षा खूप पुढे गेला आहे. या संघाची सर्वात मोठी ताकद फिरकी गोलंदाजी असणार आहे. या संघात ‘रशीद खान’सारखा (Rashid Khan) जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज आहे. तर याशिवाय, संघात मोहम्मद नबी (Mohammad Nabi) आणि नूर अहमद (Noor Ahmad) देखील आहेत. हे तिघे मिळून कोणत्याही फलंदाजीचा विभाग उद्ध्वस्त करू शकतात.

3) न्यूझीलड- सर्व संघ त्यांच्या फिरकी गोलंदाजीत सुधारणा करून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आले आहेत. कारण त्यांना येथे फिरकी गोलंदाजांवर खेळावे लागते. या बाबतीत, न्यूझीलंडने संघात अनेक पर्यायांना स्थान दिले आहे. किवी संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज कर्णधार मिशेल सँटनर (Mitchell Starc) आहे. याशिवाय, संघात अनेक फिरकी अष्टपैलू खेळाडू आहेत. या संघाकडे ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips), मायकेल ब्रेसवेल (Michael Bracewell) आणि रचिन रवींद्रसारखे (Rachin Ravindra) चांगले फिरकी गोलंदाजीचे पर्याय आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

RCB vs GG: RCBने जिंकला टाॅस; गोलंदाजीचा निर्णय! जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर का पडला? माजी दिग्गजाने सांगितलं खरं कारण
चॅम्पियन्य ट्राॅफीमध्ये भारतीय संघात निवड न झाल्याने संतापला ‘हा’ खेळाडू! म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---