भारत-पाकिस्तान संघात आत्ताच एक मोठा सामना खेळला गेला. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये झालेला हा सामना बघण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती दुबईमध्ये उपस्थित होते. तसेच हा सामना बघण्यासाठी चाहते आतुरतेने वाट बघत असतात. तसेच आता चाहत्यांसाठी एक चांगली गोष्ट आहे की, यावर्षी भारत आणि पाकिस्तान संघात तीन अजून सामने खेळले जाऊ शकतात. एशिया कप 2025 स्पर्धेचं आयोजन यावर्षी सप्टेंबर महिन्यात होणार आहे.
एशिया कप 2025 स्पर्धेत एकूण 19 सामने खेळले जाणार आहेत. तसेच स्पर्धेचे आयोजन सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. स्पर्धेच अधिकृत वेळापत्रक अजून आलेलं नाही.
एशिया कप स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ खेळणार आहेत. या स्पर्धेचे यजमानपद भारतीय संघाकडे असणार आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान संघ अ गटात सामील असतील. दोन्ही संघ ग्रुप स्टेज सामन्यानंतर स्पर्धेतील आणखी दोन सामने खेळतील.
एशिया कप 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान एक सामना होणार हे नक्की आहे. कारण दोन्ही संघ एकाच गटात आहेत. यानंतर गटातील सर्वोत्तम दोन संघ संघांची 4 संघामध्ये भिडंत होईल. यामध्ये भारत आणि पाकिस्तान समोरासमोर येऊ शकतात. जर दोन्ही संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले तर त्यांच्या मध्ये सामना पाहायला मिळू शकतो.
एशिया कप 2025 स्पर्धेची यजमान भारत संघ असणार आहे. पण क्रिकबज रिपोर्टनुसार स्पर्धेचे आयोजन भारताबाहेर होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खराब राजनैतिक संबंधांमुळे स्पर्धेतील सामन्यांचं भारताबाहेर आयोजन करण्यात येऊ शकतं. पण या स्पर्धेचे यजमानपद भारतीय संघाकडेच राहील.
एशिया कप 2025 स्पर्धेच्या यजमान पदावर श्रीलंका आणि यूएई यांच्यातही चर्चा होत आहे. स्पर्धेत एकूण आठ संघ खेळतील. भारत ,पाकिस्तान यांच्याशिवाय बांगलादेश श्रीलंका, अफगाणिस्तान,यूएई, ओमान आणि हॉंगकॉंग.
2031 पर्यंत चार एशिया कप मधील यजमान संघ पक्के आहेत. 2027 मध्ये बांगलादेश संघ यजमान असेल. या हंगामात एशिया कप वन-डे फॉरमॅटमध्ये खेळला जाईल. 2029 मध्ये पाकिस्तान संघ यजमान असणार आहे. तेव्हा सामने टी20 फॉरमॅटमध्ये खेळले जातील तसेच 2031 मध्ये एशिया कप वनडे फॉरमॅट मध्ये श्रीलंका मध्ये आयोजित केला जाईल.
हेही वाचा
क्रिकेटमध्ये मोठा धमाका? अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इतिहास रचणार का?
“क्रिकेट आणि परंपरेचा संगम! भारत-न्यूझीलंड सामन्यात प्रेक्षकांना मोफत इफ्तार बॉक्स”
अफगाणिस्तानचा आत्मविश्वास उंचावला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध संपूर्ण रणनीती तयार – हसमतुल्लाह शाहिदी