भारतीय क्रिकेट संघाला मंगळवारी (06 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर श्रीलंकेशी दोन हात करायचे आहेत. उभय संघात आशिया चषक 2022 मधील तिसरा सुपर-4 सामना होणार आहे. हा सामना जिंकत श्रीलंकेचा संघ अंतिम सामन्यातील त्यांचा दावा मजबूत करेल. तर भारतीय संघासाठी ही करा वा मरा लढत असेल. हा सामना गमावल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात येईल. त्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघ मजबूत प्लेइंग इलेव्हनसह उतरेल.
पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) मागील सुपर-4 सामन्यातील (Asia Cup 2022) भारताची प्लेइंग इलेव्हन जास्त तगडी दिसली नव्हती. दुखापतग्रस्त रविंद्र जडेजा स्पर्धेबाहेर झाल्याने, त्याच्याजागी दीपक हुड्डा याला फिनिशरच्या रूपात संघात सहभागी केले गेले होते. परंतु 14 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने केवळ 16 धावा करून तो बाद झाला.
परिणामी श्रीलंकेविरुद्ध त्याला बाकावर बसवले जाऊ शकते. हुड्डाला (Deepak Hooda) बाहेर करत अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आणि फिनिशर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची संघात एन्ट्री केली जाऊ शकते. तो मधल्या फळीला मजबूत बनवू शकतो.
गोलंदाजी विभागात बदलाची फार कमी शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्ध अर्शदीप सिंग आसिफ अलीचा झेल सोडल्यामुळे प्रचंड ट्रोल झाला होता. परंतु त्याचे गोलंदाजी प्रदर्शन प्रशंसनीय राहिले होते. त्याने 3.5 षटके फेकताना फक्त 27 धावा दिल्या होत्या. तो या सामन्यात 10 पेक्षा कमी इकोनॉमी रेटने धावा देणाऱ्या दोन गोलंदाजांपैकी एक होता. अशात त्याला संघात कायम ठेवले जाऊ शकते. मात्र फिरकीपटू रवी बिश्नोईला बाहेर बसवत अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले जाऊ शकते.
तसेच फिरकीपटू युझवेंद्र चहल या सामन्यात महागडा ठरला होता. अशात कर्णधार रोहित शर्मा आर अश्विनला घेण्याचा विचार करू शकतो.
भारताची संभाव्य प्लेइंग (India’s Predicted Playing Xi) इलेव्हन–
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंडया, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि युजवेंद्र चहल किंवा आर अश्विन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याला वेळोवेळी सपोर्ट केला तरीही…’, बीसीसीआय अधिकाऱ्याने काढली विराटची उणीधुणी
‘तुला कळत नाही का**!’ फोटोखाली चुकीची कमेंट करणाऱ्याला संजना गणेशनने झापलं
भारताविरुद्ध १९४ धावांची खेळी करणारा फलंदाज, मुलीच्या मृत्यूनंतर लागला होता धार्मिक प्रवचन द्यायला