आगामी आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (Women’s World Cup 2022) चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय महिला संघ (India Womens Team) विश्वचषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात ६ मार्चला करेल. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघ कट्टर विरोधी पाकिस्तानच्या संघासोबत भिडणार आहे.
पुढच्या वर्षी खेळला जाणारा आयसीसी महिला विश्वचषक न्यूझीलंडमध्ये आयोजित केला गेला आहे. आयसीसीने जाहीर गेलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विश्वचषकाची सुरुवात ४ मार्चपासून होणार आहे. यामध्ये पहिला सामना यजमान संघ न्यूझीलंड आमि वेस्ट इंडीज यांच्यात होईल. यावेळी विश्वचषकात एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत, यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया. न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांचा समावेश आहे.
महिला विश्वचषकाचे आयोजन पुढच्या वर्षीच्या ४ मार्च पासून ते ३ एप्रिलदरम्यान केले गेले आहे. विश्वचषकाचे सामने न्यूझीलंडमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळले जातील, यामध्ये ऑकलंड, क्राइस्टचर्च, डुनेडिन, हॅमिल्टन, तौरंगा आणि वेलिंग्टन या शहरांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियामध्ये २०२० मध्ये टी-० महिला विश्वचषकाचे आयोजन केले गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या काळात एकाही आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले गेले नव्हते. आता दोन वर्षानंतर महिला क्रिकेटमधील ही पहिलाच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली गेली आहे.
भारताच्या महिलाचा क्रिकेट संघाचा विश्वचषकातील इतिहास पाहिला, तर तो निराशाजनक राहिला आहे. महिला संघाने आतापर्यंत एकदाही विश्वचषकाचे जेतेपद जिंकलेले नाही. एकंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोनच संघ आहेत, ज्यांनी महिला विश्वचषकात जेतेपद जिंकले आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सहा वेळा विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे, तर इंग्लंडने चार वेळा विश्वचषक जिंकला आहे.
भारतीय संघ यापूर्वी दोन वेळा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. मात्र, संघाला विजय मिळवता आला नाही. मागच्या वेळच्या विश्वचषकात संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. पण या सामन्यात इंग्लंड संघाने भारताला पराभूत केले होते.
महत्वाच्या बातम्या –
एक कॉल आला अन् दीडतासात विराटच्या कॅप्टन्सीचा गेम खल्लास
विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेणार की नाही? बीसीसीआय अधिकाऱ्याचा खुलासा
विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेणार की नाही? बीसीसीआय अधिकाऱ्याचा खुलासा