भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबर 2020 पासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर डिसेंबर महिन्यात कसोटी मालिका खेळली जाईल. कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने काही युवा प्रतिभावान खेळाडूंना संधी दिली आहे. या युवा खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांच्या कामगिरीने कहरच केला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी त्यापैकीच एक असलेल्या खेळाडूची तुलना थेट रिकी पॉंटिंगशी केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका 17 डिसेंबर पासून सुरु होईल. युवा क्रिकेटपटू विल पुकोव्हस्की आणि कॅमेरून ग्रीनसह पाच क्रिकेटपटूंना या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया कसोटी संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेतून त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. टीम पेनच्या नेतृत्वात संघातील अन्य नव्या चेहर्यांमध्ये वेगवान गोलंदाज सीन ऍबॉट, फिरकीपटू मिशेल स्वेप्सन आणि अष्टपैलू मायकल नासीर यांचा समावेश आहे.
कॅमेरून ग्रीनबद्दल बोलताना ग्रेग चॅपल म्हणाले की, “डॉन ब्रॅडमननंतर कॅमेरून ग्रीन हा देशातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे.”
रिकी पॉंटिंग तरुण असतानाही त्याच्याकडून अशाच प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या पॉंटिंगशी तुलना करत चॅपेल म्हणाले की, “हा मुलगा खेळू शकतो, त्याच्याकडे अफाट प्रतिभा आहे.रिकी पाँटिंगनंतर मी त्याला सर्वात प्रतिभावान खेळाडू म्हणून पाहिले आहे.”
ग्रेग चॅपेल यांनी सेनला सांगितले की, “त्याच्यात काहीतरी खास आहे, तो सहा फुटांपेक्षा अधिक उंचीचा आहे आणि तंदुरुस्त आहे. आम्ही इतक्या उंचीच्या फलंदाजाला क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवताना कधीच पाहिलं नाही. कॅमेरून गोलंदाजीही करू शकतो. लांब उंची असल्यामुळे तो अधिक काळ स्पेल टाकू शकतो.”
ग्रीनने 19 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 49.83 च्या सरासरीने 1196 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने चार शतकेही ठोकली आहेत. त्याने दोनदा पाच बळीही घेतले आहेत. 30 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.
ग्रेग चॅपेल म्हणाले, “तो अव्वल सहा फलंदाजांपैकी एक आहे. तो स्वत: ला फलंदाज मानतो, गोलंदाजी एक बोनस पॉईंट आहे.”
डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबूशेन सारख्या दिग्गजांसोबत ग्रीन कसा खेळतो याबद्दल चॅपल उत्साही आहे. स्मिथनंतर तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तो 10-12 षटकेही सहज फेकू शकतो. चॅपल म्हणाले, “त्याला अनुभव आल्यास तो पुढील ऍशेस मालिका आम्हाला जिंकवू शकतो.”
ऑस्ट्रेलियाला भारताबरोबर मालिका खेळायची आहे. त्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी (10 नोव्हेंबर) वनडे आणि टी20 संघाची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियाच्या संघात न्यू साउथ वेल्सच्या मॉजेस हेनरिक्सचाही समावेश आहे. 33 वर्षीय हेनरिक्स 2017 पासून ऑस्ट्रेलियाकडून खेळला नाही. हेनरिक्सबद्दल बोलताना चॅपल म्हणाले की “तो एक चांगला क्रिकेटपटू आहे. बिग बॅश लीगमध्ये त्याचा फॉर्मही चांगला होता.”
तसेच कॅमेरून ग्रीनचा देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगला फॉर्म होता. 18 सदस्यीय संघात अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनला संधी दिली नाही. ही आश्चर्याची बाब आहे.
ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याचा तयारीत आहे. 2018-19 मध्ये त्यांनी ही स्पर्धा गमावली होती. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होईल, त्यानंतर तीन टी20 सामने खेळले जाईल. यानंतर कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होईल.
निवडकर्त्यांनी 19 सदस्यीय ऑस्ट्रेलिया अ संघाचीही घोषणा केली आहे. ज्यामध्ये कसोटी संघातील 9 सदस्य आहेत. हा संघ भारताविरुद्ध सराव सामना खेळेल.
भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम ऑस्ट्रेलिया-
टीम पेन (कर्णधार), सीन ऍबोट, जो बर्न, पॅट कमिन्स, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशाने, नॅथन लायन, मायकेल नासीर, जेम्स पॅटिन्सन, विली पुकोवस्की, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेप्सन, मेथ्थ्यू वेड व डेविड वॉर्नर
ऑस्ट्रेलिया अ संघ –
सीन ऍबॉट, ऍश्टन अगर, जो बर्न्स, जॅक्सन बर्ड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), हॅरी कॉनवे, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, मोझेस हेंड्रीक्स, निक मॅडिनसन, मिशेल मार्श (फिट असेल तर), मायकेल नासीर, टिम पेन, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, मार्क स्टेकी, विल सदरलँड, मिशेल स्वेप्सन
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
-मोठी बातमी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात ४ मोठे बदल, दुखापतीमुळे मोठा खेळाडू मालिकेबाहेर
-भारताविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर