भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड येथे 17 डिसेंबर पासून दिवस रात्र कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांनी सलामी फलंदाज आणि यष्टीरक्षक यासाठी आपली पहिली पसंती कोण असणार आहेत, हे त्यांनी चाहत्यांना सांगितले आहे.
गावसकर यांचे म्हणणे आहे की, सलामीला फलंदाजी करण्यासाठी ते पृथ्वी शाॅपेक्षा शुभमन गिलला पहिली पसंती असणार आहे. त्याचप्रमाणे यष्टिरक्षक म्हणून रिद्धीमान साहा ऐवजी त्यांंची पहिली पसंती रिषभ पंतला असणार आहे. पंतने सराव सामन्यात शतकी खेळी केली होती. त्याच्या बॅट मधून 73 चेंडूत 103 धावा निघाल्या होत्या. त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या मागील दौऱ्यातही रिषभ पंतने एक शतक ठोकले होते.
सुनील गावसकर म्हणाले, “निवड समितीसाठी खुप अवघड जाणार आहे. कारण रिषभ पंतने दोन वर्षांपूर्वी 4 कसोटी सामने खेळले होते. त्याने एक शतक ठोकले होते आणि यष्टीमागेसुद्धा चांगली कामगिरी केली होती. काही दिवसांपूर्वी त्याने सराव सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यामुळे तो व्यवस्थापकांची पसंती असायला हवी.”
गावसकर म्हणाले,” यष्टीरक्षणामध्ये तंत्रानुसार जास्त सक्षम साहा व्यतिरिक्त मी पंतला पसंती देईल कारण ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या यष्टीरक्षणासाठी आव्हानात्मक नाहीत. ज्या खेळपट्टीवर चेंडू वळण घेतो, त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ यष्टिरक्षकाची गरज असते आणि अशामध्ये साहा पहिली पसंती असता. परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक यष्टीच्या थोडा मागे थांबू शक्यतो आणि त्याच्याकडे जास्त वेळ असेल तर रिषभ पंत पहिली पसंती असेल.”
शुभमन गिलने करावी डावाची सुरुवात
गावसकर आणि बॉर्डर या दोघांनी ही सलामी फलंदाज म्हणून मयंक अग्रवाल सोबत शुभमन गिलच्या नावाला पसंती दिली आहे. गावसकर म्हणाले,” भारतीय सलामी फलंदाजाची जोडी असून अस्थिर आहे. मयंक अग्रवाल एक सलामी फलंदाज आहे मात्र त्याच्यासोबत कोण उतरणार. शुभमन की पृथ्वी.”
गिलने दोन सराव सामन्यात 0, 29, 43 आणि 65 धावा केल्या आहेत, तर पृथ्वीने 0, 19, 40 आणि 3 धावा केल्या आहेत. त्यामुळे एलेन बॉर्डर म्हणाले, “मी सिडनीत गिलची फलंदाजी पाहिली आणि खूप प्रभावित झालो. त्याचे तंत्र चांगले आहे आणि वय कमी असल्याच्या कारणाने तो काही फटके अपरिपक्व खेळतो. परंतू तो दमदार फलंदाज आहे. मी त्याला निवडेल.”
सुनील गावसकर म्हणाले, “पृथ्वी शाॅला आपल्या फलंदाजीवर काही काम करावे लागेल. सलामीच्या फलंदाजाला वेळेची गरज असते. ज्यामुळे नव्या चेंडूला चांगल्या प्रकारे खेळू शकेल. त्याला आपला बचाव मजबूत करावा लागेल.”
संबधित बातम्या:
– नव्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीयांची बल्ले-बल्ले; सहा खेळाडू टॉप टेन मध्ये
– रिषभ पंत दुसरा ऍडम गिलख्रिस्ट! माजी भारतीय क्रिकेटरची मोठी प्रतिक्रिया
– साहा आणि पंतमध्ये कोण असावा पहिल्या कसोटीत यष्टीरक्षक?, माजी दिग्गजाची या खेळाडूला पसंती