बांग्लादेशला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आता तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. जो ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर होईल. हे नवीन स्टेडियम असून यावर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी तेथील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. भारताने या मालिकेसाठी कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा संघाची निवड केली आहे. ज्यामध्ये तीन अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश आहे.
टीम इंडियाच्या संघात नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि हर्षित राणा या नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. नितीशची याआधीही निवड झाली होती. पण तो झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळू शकला नाही. कारण दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर पडला होता. मात्र आता तो परतला आहे. याशिवाय वरुण चक्रवर्तीही बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडियात परतला आहे. अशा परिस्थितीत ही मालिका अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाची ठरणार आहे. मात्र सर्वांच्या नजरा हवामानावरही असतील कारण बांग्लादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीतील बहुतांश खेळ पावसामुळे रद्द झाला होता. चला तर मग जाणून घेऊयात ग्वाल्हेरमध्ये आजचे हवामान कसे असेल.
ग्वाल्हेरमध्ये होणाऱ्या भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात पावसाचे सावट नसल्याने चाहत्यांची मजा अजिबात खराब होणार नाही. हवामानखात्यानुसार, सामना सुरू होण्याच्या वेळी तापमान 30 अंशांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग 2 किमी/तास असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामन्यासाठी हवामान चांगले राहील.
बांग्लादेश मालिकेसाठी भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव
हेही वाचा-
4 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या रैनानं शाकिबला धो-धो धुतलं, मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी; VIDEO पाहा
आयपीएलमध्ये विकले गेले 5 सर्वात महागडे भारतीय खेळाडू, युवराज सिंगचा रेकॉर्ड आजपर्यंत अतूट
आयपीएल 2025 पूर्वी हार्दिक पांड्याला धक्का! मुंबईच्या कर्णधारपदासाठी हा खेळाडूने केली ईच्छा व्यक्त