भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने बांगलादेशचा 2-0 ने धुव्वा उडवला. पण आता भारत-बांगलादेश संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर देखील झाला आहे. तत्पूर्वी आपण दोन्ही संघात आतापर्यंत टी20 मध्ये कोणाचं पारडं जड राहिलं आहे, हे जाणून घेऊया.
भारत आणि बांगलादेश (India And Bangladesh) संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला (6 ऑक्टोबर) पासून सुरू होणार आहे. दोन्ही संघ पहिला सामना खेळण्यासाठी ग्वाल्हेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. भारत-बांगलादेश संघातील हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाले, तर दोन्ही संघात आतापर्यंत 14 टी20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये बांगलादेशने फक्त एकच सामना जिंकला आहे, तर भारताने 13 सामन्यात विजय मिळवला आहे.
2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एका टी20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचा कर्णधार होता. हा सामना दिल्लीत झाला, भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 148 धावा केल्या. बांगलादेशने हे लक्ष्य केवळ 3 विकेट्स गमावून पूर्ण केले होते. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकाॅर्ड दीपक चहरच्या (Deepak Chahar) नावावर आहे, ज्याने 3 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत.
भारत-बांगलादेश टी20 मालिका वेळापत्रक-
पहिला टी20 सामना- 6 ऑक्टोबर, ग्वाल्हेर
दुसरा टी20 सामना- 9 ऑक्टोबर, अरूण जेटली
तिसरा टी20 सामना- 12 ऑक्टोबर, राजीव गांधी स्टोडियम
महत्त्वाच्या बातम्या-
गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांच्या कोचिंगमधील 5 मोठे फरक, सविस्तर जाणून घ्या
श्रीलंका-पाक सामन्यात नवा राडा, रुमाल पडल्यानं फलंदाजाला जीवदान; नियम समजून घ्या
“जोपर्यंत धोनीची इच्छा आहे, तोपर्यंत आयपीएलचे नियम बदलत राहतील”, दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा