भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाहिला कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंड संघाने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंवर टिकांचे सत्र सुरू झाले आहे. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याचबरोबर इंग्लंड संघाचा दिग्गज क्रिकेटपटू नासिर हुसेनने विराट कोहलीच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहे.
विराट कोहली पालकत्व रजेनंतर पुन्हा संघात परतला आहे. परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. इंग्लंड संघाने पहिल्या डावात बलाढ्य ५७८ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला आलेला भारतीय संघ १० बाद ३३७ धावाच करू शकला. तर इंग्लंडने दुसऱ्या डावात १७८ धावा करत पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीसह भारताला ४२० धावांचे आव्हान दिले. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला १९२ धावाच करता आल्या. यात कर्णधार विराट कोहली याने पहिल्या डावात ११ आणि दुसऱ्या डावात ७२ धावा केल्या.
नासिर हुसेनने विराट कोहली आणि जो रूटची केली तुलना
नासिर हुसेन यांनी लिहिलेल्या एका लेखात म्हटले की, “जो रूटने इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी योग्य रित्या पार पाडली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इथेच फसला आहे. कर्णधार म्हणून मी त्याचे समर्थन नाही करत. कारण तो चेंडूचा पाठलाग करत असतो. कधी कधी तो खेळात मागे पडतो. तो खेळावर पूर्णपणे पकड बनवत नाही. तसेच रूट आणि कोहली या दोघांनाही माहीत आहे की सर्वच गोष्टीचे निष्कर्ष हे निकालावरून ठरत असतात. ”
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
विराट कोहली याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव दशकातील सर्वोत्तम फलंदाजमध्ये का घेतले जाते, हे तो मैदानावर आपल्या खेळातून नेहमीच दाखवत असतो. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ८७ कसोटी सामन्यात ५३.४ च्या सरासरीने ७३१८ धावा केल्या आहेत. यात २७ शतक आणि २३ अर्धशतकातकांचा समावेश आहे. तसेच त्याने खेळलेल्या २५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५९.३ च्या सरासरीने १२०४० धावा केल्या आहेत. यात ४३ शतक आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. याचबरोबर ८५ टी- २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५०.५च्या सरासरीने त्याने २९२८ धावा केल्या आहेत. यात २५ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–मॅचविनर कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये का संधी दिली नाहीस?, कर्णाधार कोहली म्हणतोय
–टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्याची समीकरणं बदलली
–जे कुणाला जमलं नाही ते रुटने करुन दाखवलं! विक्रमांचे विक्रम करताना मोडला मुंबई कसोटीत झालेला तो विक्रम
–व्हिडीओ- कर्णधार विराट कोहली भडकला, थेट पंचांकडे केली जोफ्राच्या त चुकीची त्या तक्रार






