भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाला २२७ धावांनी पराभूत केले आहे. चेन्नईच्या मैदानावरील गेल्या २२ वर्षातील सर्वात मोठा पराजय आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश केला होता. यात आर.अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम यांचा समावेश होता. आर. अश्विन याने उत्कृष्ट गोलंदाजी करत ९ गडी बाद केले. परंतु वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम याला साजेशी कामगिरी करता आली नाही. सामन्यानंतर विराटला यावरच प्रश्न विचारण्यात आले.
सामना झाल्यानंतर ३ फिरकी गोलंदाज खेळवण्याच्या निर्णयाबाबत विराट कोहली म्हणाला
कर्णधार विराट कोहलीला सामना झाल्यानंतर विचारण्यात आले होते की, ‘भारतीय संघाला कुलदीप यादव याची संघात निवड न केल्यामुळे काही फरक जाणवला का?’ त्याच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला फायदा होऊ शकला असता.’ यावर उत्तर देताना विराट कोहली म्हणाला, “मुळीच नाही, आम्हाला थोडाही पश्चाताप होत नाहीये. आम्ही संघात दोन ऑफ स्पिनर घेऊन उतरलो होतो. त्यामुळे, यांच्यासोबत कुलदीप यादवला संघात समाविष्ट करणे योग्य नव्हते. जर त्याला संघात समाविष्ट केले असते तर तिन्ही फिरकी गोलंदाज एकसारखेच झाले असते. यामुळेच तिसरा ऑफ स्पिनर म्हणून आम्ही डाव्या हाताचा गोलंदाज नदीमला संघात संधी दिली.”
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
पहिल्या सामन्यात इंग्लंड संघ विजयी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाहिला कसोटी सामना ५ ते ९ फेब्रुवारी रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला होता. यात इंग्लंड संघाने पहिल्या डावात ५७८ धावा आणि दुसऱ्या डावात १७८ धावा केल्या होत्या. भारतीय संघाला दोन्ही ही डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने पहिल्या डावात ३३७ आणि दुसऱ्या डावात अवघ्या १९२ धावा केल्या. इंग्लंड संघाने हा सामना २२७ धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्याची समीकरणं बदलली
–जे कुणाला जमलं नाही ते रुटने करुन दाखवलं! विक्रमांचे विक्रम करताना मोडला मुंबई कसोटीत झालेला तो विक्रम
–व्हिडीओ- कर्णधार विराट कोहली भडकला, थेट पंचांकडे केली जोफ्राच्या त्या चुकीची तक्रार
–इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल फ्लॉप, एक-दोन नव्हे चक्क चौघे बोल्ड-आऊट






