भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाहिला कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंड संघाने जो रुटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २२७ धावांनी पराभूत केले आहे. इंग्लंड संघाच्या दृष्टीने भारतामधील त्यांचा हा सर्वात मोठा विजय आहे. तर भारतीय संघ २२ वर्षानंतर पहिल्यांदाच चेन्नईच्या मैदानावर पराभूत झाला आहे.
या विजयानंतर इंग्लंड संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुण तालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारतीय संघ या पराभवानंतर चौथ्या स्थानावर गेला आहे. दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंड संघ आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंड संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका समाप्तीनंतर कोणता संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळेल हे समजणार आहे.
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
कुठला संघ प्रवेश करू शकतो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका संपल्यानंतर अंतिम फेरीत कुठला संघ प्रवेश करेल हे समजणार आहे. जर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका बरोबरीत सुटली तर ऑस्ट्रेलियन संघाला लॉर्डसमध्ये अंतिम सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघाला जर अंतिम फेरी गाठायची असेल तर इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत.
भारतीय संघ जर इंग्लंड संघाला २-१ ने पराभूत करण्यास यशस्वी झाला तरी भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. तसेच इंग्लंड संघाने १-० , २-० किवा २-१ ने जरी मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत दाखल होणार. इंग्लंड संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी मालिका ३-०,३-१ किंवा ४-० ने जिंकावी लागणार आहे.
गुण तालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला इंग्लंड संघ
इंग्लंड संघ ७०.२% जिंकण्याच्या सरासरीने पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तसेच न्यूझीलेंड संघ ४२० गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिका दौरा स्थगित केला आहे. तरी सुद्धा ऑस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो. तसेच भारतीय संघ ६८.३ % जिंकण्याच्या सरासरीने चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल फ्लॉप, एक-दोन नव्हे चक्क चौघे बोल्ड-आऊट
–बुढ्ढे में है दम! पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला अंडरसन अनेकार्थाने ठरलाय ऐतिहासिक खेळाडू






