---Advertisement---

एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे मोठी खुशखबर

---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी दुखापतीतून सावरला असून उद्या(3 फेब्रुवारी) वेलिंगटन येथे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या पाचव्या वनडे सामन्यात तो खेळण्यासाठी तयार असल्याची माहिती भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी दिली आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना धोनीला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मुकावा लागला होता.

धोनीने चौथ्या वनडेआधी भारतीय संघाबरोबर सरावही केला होता. परंतू तो पूर्णपणे फिट झाला नसल्याने त्याचा चौथ्या वनडे सामन्यासाठी अंतिम 11 जणांच्या संघात समावेश करण्यात आला नव्हता.

त्याच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिकने तिसऱ्या आणि चौथ्या वनडेत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. दिनेशने तिसऱ्या वनडेत अंबाती रायडूसह चांगली फलंदाजी करताना नाबाद 38 धावांची खेळी केली होती. मात्र चौथ्या वनडेत त्याला भोपळाही फोडता आला नाही.

धोनी यावर्षी चांगल्या लयीत खेळत असून त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत 33 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धही तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतके केली होती. या मालिकेत त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

तेंडुलकर-गांगुलीच्या त्या विक्रमला रोहित शर्माकडून आहे धोका

तो जागतिक विक्रम रोहित शर्मासाठी केवळ हाकेच्या अंतरावर

वाढदिवस विशेष: एक हात मोडला असताना ग्रॅमी स्मिथ आला मैदानात, पुढे काय झाले पहाच!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment