टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील चौथा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात खेळवला जाणार आहे. रविवारी (दि. 23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पार पडणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नाणेफेकीवेळी सांगितले की, भारतीय संघाकडून 7 फलंदाज, 3 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटूंना खेळवणार आहे. यावेळी भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, युझवेंद्र चहल, रिषभ पंत, हर्षल पटेल आणि दीपक हुड्डा यांना संघात घेतले नाही.
🚨 Toss Update & Team News from MCG 🚨@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bowl against Pakistan. #T20WorldCup | #INDvPAK
Follow the match ▶️ https://t.co/mc9useyHwY
Here's our Playing XI 🔽 pic.twitter.com/1zahkeipvm
— BCCI (@BCCI) October 23, 2022
दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने म्हटले की, त्यांनी इंग्लंडविरुद्ध टी20 मालिका खेळलीये. तसेच, न्यूझीलंडविरुद्ध तिरंगी मालिकाही खेळलीये. त्यामुळे ते सज्ज आहेत. या सामन्यात भारताप्रमाणेच पाकिस्तानही 3 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीटपटूंना खेळवणार आहे.
🚨 T O S S A L E R T 🚨
India win the toss and opt to field first 🏏
Our lineup for the match 🇵🇰#WeHaveWeWill | #T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/tTjEQh17OI
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 23, 2022
या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
पाकिस्तान संघ-
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शान मसूद, हैदर अली, मोहम्मद नवाझ, शादाब खान, इफ्तिकार अहमद, हासिफ अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिझवान खेळणार 40 ओव्हर? भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल तोंडाला येईल ते बोलला ‘मारो मुझे मारो’ कॉमेडियन
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान वेगळाचं! भारतावर पडलायं भारी, एकदा आकडेवारी पाहाच