भारतीय संघ पुन्हा एकदा वनडे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यात यशस्वी झाला. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने होते. भारताने रोहित शर्मा याच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर हा सामना सहजरीत्या नावावर केला. या सामन्यात रोहित जबरदस्त फटकेबाजी करताना दिसला. त्याच्या बॅटमधून गगनचुंबी षटकार निघाले. हे पाहून मैदानी पंच मरे इरॅस्मस हेदेखील अचंबित झाले. यावेळी त्यांनी रोहितला प्रश्न विचारला, त्यावर त्याने काय प्रतिक्रिया दिली कर्णधाराने स्पष्ट केले आहे. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पंचांना दाखवला बायसेप
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पाकिस्तानच्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 63 चेंडूत 86 धावांची झंझावाती खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. सामन्यादरम्यान रोहित पंच मरे इरॅस्मस (Marais Erasmus) यांना आपला बायसेप दाखवताना दिसला. आता हे जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक होते की, त्याने असे का केले. याचा खुलासा खुद्द रोहितने केला आहे.
रोहितचा खुलासा
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित पंचांशी झालेल्या संभाषणाबद्दल भाष्य करताना दिसत आहे. या व्हिडिओत दिसते की, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) रोहितला पंचांशी झालेल्या संभाषणाबाबत विचारतो. तेव्हा रोहित म्हणाला की, “ते मला विचारत होते की, इतके लांब षटकार कसे मारतो? तुझ्या बॅटमध्ये काहीतरी आहे. मी त्यांनी म्हणालो की, बॅटमध्ये काही नाहीये, ही माझी पॉवर आहे.”
https://www.instagram.com/p/CyZ8E5_NLod/
रोहित जबरदस्त फॉर्ममध्ये
खरं तर, रोहित शर्मा वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. मात्र, ही कमी त्याने पुढील दोन्ही सामन्यात पूर्ण केली. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर धावांचा वादळी फलंदाजी करत 131 धावा चोपल्या. त्यानंतर आता पाकिस्तानविरुद्ध त्याने 86 धावा केल्या.
विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर रोहित अव्वल 3मध्ये पोहोचला आहे. त्याने 3 सामन्यात 72.33च्या सरासरीने 217 धावा केल्या आहेत. तो या विश्वचषकात 200 धावांचा आकडा पार करणारा पहिला भारतीय बनला आहे. रोहितव्यतिरिक्त या यादीत दुसऱ्या न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे आहे. त्याने 229 धावा केल्या आहेत. तसेच, पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवान हा 248 धावांसह अव्वलस्थानी आहे. (india vs pakistan World Cup 2023 rohit sharma revealed after seeing long sixes umpire marais erasmus told him there is something in your bat know here)
हेही वाचा-
‘एक मॅच मला खराब गोलंदाज…’, पाकिस्तानी कर्णधाराची विकेट घेणाऱ्या सिराजची सर्वात मोठी प्रतिक्रिया
INDvsPAK: लाजीरवाऱ्या पराभवानंतर पाकिस्तान संघाचा संचालक कडाडला; म्हणाला, ‘आज रात्री…’