fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टॉप ५: भारत-विंडीज टी२० मालिकेत होणार हे खास ५ विक्रम

हैद्राबाद। आजपासून (6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

या टी20 मालिकेत भारत आणि वेस्ट इंडीजच्या काही खेळाडूंना खास विक्रम करण्याची संधी आहे.

आजपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेत होऊ शकतात हे विक्रम –

– रोहित शर्माने 1 किंवा किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार पूर्ण करेल. 400 षटकारांचा टप्पा पार करणारा तो ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी नंतरचा जगातील केवळ तिसराच क्रिकेटपटू ठरेल.

– या मालिकेत दीपक चाहरने जर 8 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करेल.

– या मालिकेत वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने जर 47 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा वेस्ट इंडीजचा चौथा क्रिकेटपटू ठरेल.

– केएल राहुलने 26 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावांचा टप्पा पार करेल. तसेच हा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ सातवा क्रिकेटपटू ठरेल.

– या मालिकेत जर विराट कोहलीने 119 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो भारतात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा पूर्ण करेल. तसेच हा टप्पा पार करणारा पहिलाच भारतीय ठरेल.

– सध्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विश्वविक्रम विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नावावर विभागून आहे. या दोघांनाही 22 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.  त्यामुळे आता कोण कोणाला मागे टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

– लेंडल सिमन्सने या मालिकेत 86 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा पूर्ण करेल.

– या मालिकेत जर भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने 3 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो आर अश्विन(52 विकेट्स) आणि जसप्रीत बुमराहला(51 विकेट्स) मागे टाकत भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. चहलच्या सध्या 50 विकेट्स आहेत.

– दीपक चाहरने जर 6 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तो ट्वेंटी20मध्ये एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल. त्याने यावर्षी 52 विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी20मध्ये एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत तो बुमराह पाठोपाठ श्रेयस गोपाळसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बुमराहने 2016मध्ये 57 विकेट्स घेतल्या होत्या. तर गोपाळने 2019 या वर्षी 52 विकेट्स घेतल्या आहेत.

You might also like