भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. उभय संघांतील या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे. विराट भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचा एक खास विक्रम मोडू शकतो. पण विराट आज फलंदाजीसाठी कोणत्या क्रमावर येतो हे पाहण तितकच महत्वाच असेल.
वनडे मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडीजने गमावल्यामुळे दुसऱ्या सामन्यातील विजय त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. जर आज वेस्ट इंडीजने हा सामना जिंकला तर मालिका 1-1 अशा बरोबरीवर येईल. असे झाले तर शेवटचा सामना निर्णायक ठरेल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीयने यजमान वेस्ट इंडीजला 114 धानांवर सर्वबाद केले. तसेच भारताच्या फलंदाजी क्रमात मोठा फेरबद पाहायला मिळाला. डावाची सुरुवात करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. संघासाठी शेवटची धाव घेऊन रोहितने विजय मिळवून दिला. यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली (Virat kohli) फलंदाजीसाठी आलाच नव्हता.
मात्र, मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट फलंदाजीला येण्याची पूर्ण शक्यता आहे. संपूर्ण संघ आधीप्रमाणे आपल्या ठरलेल्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. असात विराटने जर फलंदाजीला आल्यानंतर 4 षटकार मारले, तर तो माजी दिग्गज एमएस धोनाचा खास विक्रम मोडीत काढेल. विराट वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.
काय आहे तो पराक्रम:
वेस्ट विंडीज विरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत रोहित अव्वल स्थानावर आहे. त्याने 35 षटकार मारत हा विक्रम रचला आहे. तर दुसऱ्या स्थानावर धोनीने 28 षटकार मारत आपली जागा बनवली आहे. मात्र, कोहली आता धोनीला मागे टाकू शकतो. कोहलीने विंडीज विरुद्ध 25 षटकार मारली आहेत. त्याला या यादीत धोनीच्या पुढे जाण्यासाठी अजून फक्त 4 षटकारांची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या:
टी20 संघातून बाहेर असलेल्या विराट-रोहितबद्दल कॅरेबियन दिग्गजाचे मोठे विधान, म्हणाला…
रॉबिन उथप्पाचा T10मध्ये धुमाकूळ, 88 धावा ठोकत संघाला मिळवून दिला विजय






