जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची संघ निवड नुकतीच करण्यात आली. या संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले. शिखर धवन या दौऱ्यावर नेतृत्व करेल तर, राहुल द्रविड यांच्याकडे प्रशिक्षक पदाची कमान देण्यात आली आहे. भारताच्या या दौऱ्याची नक्की रूपरेषा कशी असेल याबाबत आता माहिती समोर आली असून, भारताला बऱ्याच दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल.
इतके दिवस राहावे लागणार क्वारंटाईन
भारताचा श्रीलंका दौरा जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे १३ जुलैपासून सुरु होईल. भारताला दौऱ्यावर ३ वनडे व ३ टी२० सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २० सदस्यीय संघ जाहीर केला असून, आणखी पाच गोलंदाजांना नेट बॉलर म्हणून पाठवले आहे.
या दौर्याआधी सर्व भारतीय खेळाडूंना सोमवारपासून सात दिवस सक्तीचे क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यानंतर, आणखी सात दिवस काही सवलतींसह क्वारंटाईन राहावे लागेल. खेळाडूंना हे क्वारंटाईन मुंबई किंवा चेन्नई येथे केले जाऊ शकते. भारतीय खेळाडू ज्यावेळी कोलंबो येथे पोहचतील त्यावेळी देखील त्यांना तीन दिवस कठोर क्वारंटाईन कालावधी पार पाडावा लागेल. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर खेळाडूंना सरावासाठी मोकळीक देण्यात येईल.
भारतीय संघ खेळणार आपापसात सामना
भारतीय संघ श्रीलंकेमध्ये पोहोचल्यानंतर श्रीलंका अ संघाविरुद्ध काही सराव सामने खेळू इच्छित होता. मात्र, कोरोनामुळे यासाठी परवानगी मिळू शकले नाही. त्यामुळे भारतीय संघ आता आपापसात तीन सराव सामने खेळेल. यामध्ये एक टी२० व दोन वनडे सामन्यांचा समावेश आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: विजेच्या वेगाने आलेला चेंडू ‘या’ इंग्लिश क्षेत्ररक्षकाने टिपत संपवली कॉनवेची अप्रतिम खेळी
खुद्द शार्दुलचे प्रशिक्षक म्हणाले, ‘कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यात त्याला तेव्हाच खेळवा, जेव्हा…’
भारतीय वंशाच्या ‘या’ क्रिकेटपटूंचा पाकिस्तान सुपर लीगमध्ये बोलबाला, रहस्यमयी गोलंदाजाचाही समावेश