महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेला शुक्रवारपासून (दि. 10 फेब्रुवारी) केप टाऊन येथे सुरुवात झाली. स्पर्धेतील तिसरा सामना भारतीय महिला विरुद्ध पाकिस्तान महिला संघात पार पडणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी हा सामना खेळला जाईल. दोन्ही संघ या सामन्यातून आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करतील. स्पर्धेतील पुढील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. मात्र, या सामन्यात हरमनप्रीत कौर कोणता भारतीय संघ उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत टी20 विश्वचषक आपल्या नावे केला. अगदी त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न वरिष्ठ महिला संघ देखील करेल. सलग दुसऱ्यांदा हरमनप्रीत कौर टी20 विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय संघाने 2020 टी20 विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली. मात्र, अंतिम फेरीत यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलेले.
या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला नियमित उपकर्णधार स्मृती मंधाना हिची उणीव भासेल. बोटाच्या दुखापतीमुळे ती पहिल्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे सलामीवीर शफाली वर्मा, कर्णधार हरमनप्रीत कौर व रिचा घोष यांच्यावर फलंदाजी विभागाची अतिरिक्त जबाबदारी असेल. अष्टपैलू दिप्ती शर्मा व राधा यादव फिरकीची जबाबदारी सांभाळतील. वेगवान गोलंदाजीचा भार अनुभवी शिखा पांडे व युवा रेणुका ठाकूर वाहतील. भारतीय संघाला विश्वचषकात दुसऱ्या गटात पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड या संघांसोबत ठेवले गेले आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
भारतीय महिला संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधाना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकुर, अंजलि सरवानी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड आणि शिखा पांडे.
(India Womens Starts There T20 World Cup Campaign Against Pakistan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी सध्या खूपच घाबरलेलो आहे…’, पहिल्या कसोटीत विकेट्सचा पाऊस पाडणाऱ्या अश्विनचे खळबळजनक विधान
रोहितवरच फोकस करत होता कॅमेरामन, कॅप्टनची सटकताच दिली ‘अशी’ रिऍक्शन; म्हणाला, ‘अरे ये…’