---Advertisement---

चेस ऑलिंपियाड: भारतीय बुद्धिबळपटूंनी रचला इतिहास; पहिल्यांदा पटकावले सुवर्णपदक

On: सोमवार, ऑगस्ट 31, 2020 12:50 PM
---Advertisement---

काल (३० ऑगस्ट) भारत विरुद्ध रशिया या देशांमध्ये ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये खेळला गेलेला अंतिम सामना नाटकीय रुपात संपला. शेवटी बुद्धिबळ जागतिक संस्था ‘फिडे’ने दोन्ही देशांना संयुक्त रुपात विजेता घोषित केले.

फिडेने ट्विट करत माहिती दिली की, “फिडेचे अध्यक्ष आकार्डी वोरकोविच यांनी दोन्ही संघांना ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिपिंयाडमध्ये सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेतला आहे. बुद्धिबळ ऑलिंपियाडच्या इतिहासात भारत पहिल्यांदाच विजेता बनला आहे. तर रशियाने २४वेळा (१८ वेळा सोवियत संघ) सुवर्णपदक जिंकले आहे.” India Won Gold Medal In Online Chess Olympiad 2020

भारतीय संघाचे नॉन प्लेइंग कर्णधार श्रीनाथ नारायण यांनी सांगितले की, “आम्हाला फिडेतर्फे सांगण्यात आले की, दूसऱ्या सामन्यादरम्यान आमच्या ३ खेळाडूंच्या सर्वरमध्ये काही तरी अडचण आल्यामुळे ते सामन्यातून लॉग आऊट झाले होते. ते खेळाडू म्हणजे के. हम्पी, निहाल सरीन आणि दिव्या देशमुख होय. तरी आम्ही निष्पक्ष निर्णय व्हावा म्हणून या तिघांचा पुन्हा सामना घेण्याची मागणी केली होती.”

फिडेने ट्विटमध्ये लिहिले की, “बुद्धिबळ ऑलिंपियाडच्या अंतिम सामन्यातील दूसऱ्या सामन्यात २ भारतीय खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांचे खेळातून कनेक्शन तुटले होते. त्यामुळे त्यांचा वेळ वाया गेला. त्यानंतर भारताने अधिकृत अपील केली होती. याची आता तपासणी चालू आहे. भारताने म्हटले आहे की, ही समस्या चेस डॉट कॉममुळे झाली आहे. पहिला सामना ३-३च्या स्कोरवर संपला होता. त्यानंतर पुढील ६ सामने अनिर्णीत राहिले होते.”

 

भारताने पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदींनी ट्विट करत लिहिले की, “ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये विजेता ठरल्यामुळे आमच्या बुद्धिबळपटूंना शुभेच्छा. त्यांची मेहनत आणि त्यांचे समर्पण कौतुकास्पद आहे. त्यांचे हे यश निश्चितपणे इतर बुद्धिबळपटूंना प्रेरित करेल. मी रशिया संघालाही शुभेच्छा देऊ इच्छितो.”

महत्त्वाच्या बातम्या –

एस श्रीसंत लागला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीला; शेअर केले व्हिडिओ

ही भारतीय कंपनी झाली आयपीएलची पार्टनर; बीसीसीआयने केली घोषणा

जिममध्ये डान्स, एफ-१ गेम, पूल अशा गोष्टी करत बायो-बबलमध्ये खेळाडू घेतायेत आनंद, पाहा

ट्रेंडिंग लेख –

सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

तेराव्या हंगामानंतर ‘या’ २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---