ऑकलँड। आजपासून(24 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज इडन पार्क येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात भारतीय संघाने रोहित शर्मासह केएल राहुलला सलामीला संधी दिली आहे. त्याचबरोबर आजच्या सामन्यासाठी अंतिम 11 जणांच्या संघात संजू सॅमसन आणि रिषभ पंत यांचा समावेश करण्यात आलेला नसल्याने आज यष्टीरक्षणाची जबाबदारी राहुलच सांभाळेल.
तसेच आजच्या सामन्यासाठी कुलदीप यादव, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही संधी दिलेली नाही. आज कुलदीपच्या ऐवजी फिरकी गोलंदाज म्हणून युझवेंद्र चहलला संधी मिळाली आहे. तर शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा हे अष्टपैलू क्रिकेटपटू भारताच्या 11 जणांच्या संघात आहेत.
त्याचबरोबर आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडने डॅरिल मिशेल आणि स्कॉट कुग्लेजीन यांना संधी दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी दोन वेगवान गोलंदाजांना आज संधी दिली आहे. तसेच हमीश बेनेट आज न्यूझीलंडकडून त्याचे टी20 पदार्पण करत आहे.
आजच्या टी20 सामन्यासाठी असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, कॉलिन मुन्रो, केन विलियम्सन (कर्णधार), टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहॉम, मिशेल सॅंटनर, टिम साउथी, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, हमीश बेनेट
काय सांगता! आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी होतोय भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना
वाचा👉https://t.co/YheJEZIpU9👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020
न्यूझीलंड दौऱ्यापाठोपाठ आता 'या' सामन्यांनाही मुकणार शिखर धवन?
वाचा👉https://t.co/CJQF8Dog7l👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ @SDhawan25— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020