शुक्रवारी १९ वर्षाखालील विश्वचषक (u19 world cup 2022) स्पर्धेला सुरुवात झाली. यावर्षी ही विश्वचषक स्पर्धा वेस्ट इंडीजमध्ये आयोजित केली गेली आहे. स्पर्धेचा पहिला सामना वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियामध्ये (west indies u19 vs australia u19) झाला. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजला या सामन्यात सहा विकेट्सने मात दिली आणि अभियानाची सुरुवात विजयाने केली. ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा भारतीय वंशाचा निवेथन राधाकृष्णान (nivethan radhakrishnan) याने या सामन्यात तीन विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.
निवेथन मुळचा भारतीय वंशाचा आहे आणि यापूर्वी चेन्नईमध्ये राहत होता. त्याची खासियत ही आहे की, तो दोन्ही हातांनी फिरकी गोलंदाजी करू शकतो. तो १० वर्षाचा असताना त्याचे आई आणि वडील चेन्नईहून सिडनीला स्थाईक झाले. यानंतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली. क्रिकेटमध्ये स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी त्याने शाळेच्या शेवटच्या वर्षीचे शिक्षण देखील थांबवले. निवेथनचे वय सध्या १९ वर्ष आहे, पण त्याच्या म्हणण्यानुसार तो वयाच्या १५ व्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. त्याने सांगितले की, जेव्हा तो चार वर्षाचा होता, तेव्हा १४ वर्षाखालील क्रिकेट खेळत होता.
व्हिडिओ पाहा-
निवेथन डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांनी ऑफ स्पिन गोलंदाजी करू शकतो, पण हे सुरुवातीपासून असे नव्हते. त्याने स्वतःच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एका वेगवान गोलंदाजाच्या रूपात केली होती. पाच- सहा वर्षाच्या वयात निवेथन उजव्या हाताने गोलंदाजी करत होता, पण नंतर वडिलांच्या सांगण्यावरून त्याने डाव्या हाताने गोलंदाजी करण्याचा देखील प्रयत्न केला. याच कारणास्तव तो आता जगातील त्या निवडक गोलंदाजांपैकी एक आहे, जे दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतात.
Our Aussie U19's kicked off their #U19CWC campaign with a six wicket victory against the West Indies.
Teague Wyllie was the star scoring 86* (129), while Tom Whitney, Nivethan Radhakrishnan and Cooper Connolly all took three wickets.
Next up is Sri Lanka on Tuesday morning! 🇦🇺 pic.twitter.com/kYVNsMDvAs
— Cricket Australia (@CricketAus) January 14, 2022
निवेथनचे वडील अन्बु सेल्वन यांनीच त्याला सुरुवातीला गोलंदाजी करण्यासाठी प्रोत्साहीत केले होते. तो यापूर्वी तामिळनाडू संघाकडून जूनियर क्रिकेट खेळला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये स्थाईक होण्यापूर्वी निवेथनचा मोठा भाऊ तामिळनाडूच्या १४ वर्षाखालील संघात खेळत होता, ज्याचे नाव निकेथन असे होते. परंतु ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर निकेथन क्रिकेट कारकिर्दीला पुढे घेऊन गेला नाही. असे असले तरी, निवेथनने मात्र क्रिकेटचा प्रवास पुढे कायम ठेवला. त्याने आगोदर ऑस्ट्रेलियाच्या १६ वर्षाखालील संघात स्थान मिळवले होते आणि आता तो ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षाखालील संघाचा एक महत्वाचा खेळाडू बनला आहे.
निवेथन आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सच्या नेट गोलंदाजाच्या रूपात भूमिका पार पाडली आहे. यादरम्यान त्याने मार्कस स्टोइनिस, श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांसारख्या अनुभवी खेळाडूंसमोर गोलंदाजी केली आहे. त्याव्यतिरिक्त तो तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये रविचंद्रन अश्विन आणि एस बद्रीनाथ यांच्यासोबत राहिला आहे.
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी व्हिलन ठरले ‘हे’ ३ फलंदाज
अनुभवाची मोठी शिदोरी पाठीशी असणारे ‘हे’ पाच जण गाजवणार मेगा लिलाव
बदल होणारच! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून होणार भारतीय क्रिकेटची ‘नवी सुरुवात’
व्हिडिओ पाहा –