भारत आणि पाकिस्तान यांचा सामना पाहण्यासाठी दोन्हीही देशातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील वादामुळे गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये मालिका खेळली जात नाहीये. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसून येतात.अशातच दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एप्रिल महिन्यात हे दोनही संघ आमने सामने येणार आहेत.
भारतीय संघाने २०१२ नंतर,पाकिस्तान संघासोबत एकही मालिका खेळली नाहीये. अशातच येत्या २ एप्रिल पासून भारतीय नेत्रहिन संघ, पाकिस्तान नेत्रहिन संघ आणि बांगलादेश नेत्रहिन संघ यांच्यात तिरंगी मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही मालिका बांगलादेशात ढाकामध्ये खेळवण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती पाकिस्तान नेत्रहिन क्रिकेट परिषदेने दिली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,”भारत आणि पाकिस्तान नेत्रहिन संघ यांचा सामना ४ एप्रिल रोजी होणार आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश नेत्रहिन खेळाडूंची कोरोना चाचणी केली असता, ती निगेटिव्ह आली आहे.”
असे असेल सामन्यांचे वेळापत्रक
भारतीय नेत्रहिन संघाची पहिली लढत २ एप्रिल रोजी बांगलादेश नेत्रहीन संघासोबत होणार आहे. त्यानंतर ३ एप्रिल रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील लढत पाहायला मिळेल. तसेच ४ एप्रिल रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. यानंतर ६ तारखेला पाकिस्तान संघ पुन्हा बांगलादेश संघासोबत सामना खेळणार आहे आणि ७ एप्रिल रोजी पाकिस्तानचा सामना भारतीय संघासोबत होईल. या ३ संघामधून २ सर्वाधिक गुण मिळवलेले संघ ८ एप्रिल रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळताना दिसतील.
हेही वाचा-
–मंडळी राहुल द्रविडला मराठीत बोलताना ऐकलंय का? नसेल तर पाहा ‘हा’ व्हिडीओ
–व्हिडिओ : आला रे आला बुमबुम आला! बुमराह मुंबईच्या ताफ्यात दाखल
–आयपीएलमध्ये या संघाकडून खेळण्याची इच्छा होती, चेतेश्वर पुजाराने व्यक्त केली खंत