भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत क्रिकेट हंगाम आता सुरू होणार आहे, त्यामध्ये कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पुनरागमनाच्या बातमीनं खळबळ उडाली आहे. वास्तविक, दुलीप ट्रॉफी 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये केवळ रोहितच नाही तर विराट कोहलीही (Virat Kohli) परतण्याची शक्यता आहे. 5 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत 4 संघ आहेत. ज्यांना ए.बी.सी.डी अशी नावं दिली आहेत. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) शेवटचा देशांतर्गत सामना कधी खेळला होता?
रोहित शर्मा (Rohit Sharma) खरोखरच दुलीप ट्रॉफीमध्ये खेळायला आला तर तो तब्बल 8 वर्षांनंतर लाल चेंडूमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तो 2016 मध्ये शेवटचा दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला होता, जिथे तो अंतिम सामना इंडिया ब्लूकडून खेळला होता. त्या सामन्याच्या पहिल्या डावात त्यानं 30 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात त्यानं नाबाद 32 धावा केल्या होत्या.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) प्रथम श्रेणी कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 120 सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 9,123 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 29 शतकं आणि 37 अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 309 आहे. रोहित त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये फिरकी गोलंदाजी देखील करायचा, त्यामुळे त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 24 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
नेपाळची क्रिकेट टीम करणार भारताचा दौरा, टीम इंडियाविरुद्ध मॅच खेळणार का?
160 फुटांवरून उडी मारली, बाईकसह विमानात चढला…समारोप सोहळ्यात टॉम क्रूझची तुफान स्टंटबाजी!
विनेश फोगटला ‘भारतरत्न’ देण्याची मागणी, निवृत्तीच्या निर्णयावरही पुनर्विचार करण्याचं आवाहन