एमएस धोनीनंतर विराट कोहलीला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. किंग कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा कसोटी संघ एका वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसला. परदेशी भूमीवर कसोटी खेळताना टीम इंडियाने कोहलीच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. कोहलीच्या नेतृत्वापूर्वी टीम इंडिया अनेकदा परदेशी भूमीवर फ्लॉप झाली. चला तर मग या बातमीद्वारे जाणून घेऊया कोहलीच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाची आकडेवारी.
विराट कोहली 2014 मध्ये भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनला होता. 2022 पर्यंत त्यांनी कमान सांभाळली. या सात वर्षांच्या कालावधीत कोहलीने परदेशी भूमीवर खेळलेल्या 16 कसोटी जिंकल्या. तर कोहलीच्या कर्णधारपदापूर्वी 82 वर्षांच्या कालावधीत टीम इंडियाने परदेशी भूमीवर केवळ 38 कसोटी जिंकल्या होत्या.
परदेशात टीम इंडियाचा विजय – कसोटीत
कोहलीच्या कर्णधारपदापूर्वी – 82 वर्षात 38 कसोटी जिंकल्या
कोहलीच्या नेतृत्वाखाली- 7 वर्षात 16 कसोटी जिंकल्या.
विराट कोहली हा टीम इंडियाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. टीम इंडियासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी खेळणारा कोहली हा खेळाडू आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकूण 68 कसोटी सामने खेळले. यापैकी 40 सामने टीम इंडियाने जिंकले. कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे.
विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 118 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 201 डावांमध्ये फलंदाजी करताना कोहलीने 47.83 च्या सरासरीने 9040 धावा केल्या आहेत. ज्यात त्याने 29 शतके आणि 31 अर्धशतकेही ठोकल्या आहेत. कोहलीची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 254* धावा आहे. कोहलीने जून 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते.
हेही वाचा-
चक्क आपल्याच कर्णधाराशी भिडला हा खेळाडू, लाईव्ह सामन्यात ‘तू-तू मैं-मैं’, पाहा VIDEO
IND VS AUS; भारताला मिळाला नवा कसोटी सलामीवीर? रोहितच्या जागी करु शकतो ओपनिंग
श्रेयस अय्यरची बॅट पुन्हा तळपली, ओडिशाविरुद्ध शानदार द्विशतक, निवड समीतीचे डोळे उघडणार?