भारतात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसर्या लाटेने कहर केला आहे. अनेकांना या लाटेत कोरोनाचा संसर्ग झाला असून वैद्यकीय आणि आर्थिक मदतीची गरज पडते आहे. भारताची माजी महिला क्रिकेटपटू के. एस. श्रावंथी नायडू हिलाही अशाच मदतीची गरज होती. तिची आई कोरोनाची लागण झाल्याने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होती.
मात्र त्यांच्या परिवाराची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. यावेळी भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहली त्यांच्या मदतीसाठी धावून गेला.
कोहलीने केली आर्थिक मदत
श्रावंथीने आपल्या आईच्या उपचारासाठी आर्थिक गरज आवश्यक असल्याने मदतीचे आवाहन केले होते. तिने बीसीसीआय, हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन आणि इतर बोर्डांंनाही मदत करण्याचे आवाहन केले होते. भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर करत लोकांना मदतीचे आवाहन केले होते. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शिवलाल यादव यांची बहीण विद्या यादव यांनी देखील ही पोस्ट शेअर केली होती.
ही पोस्ट शेअर करतांना त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला टॅग केले होते. कोहलीने देखील यावर तात्काळ प्रतिसाद दिला. यानंतर कोहलीने ६.७७ लाखांची मदत श्रावंथी नायडूला तिच्या आईच्या उपचारासाठी केली.
कोहलीच्या या कृतीवर विद्या यादव यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “खरं सांगायचं तर कोहलीच्या या सहज स्वभावाने मी चकीत झाली. तो एक महान क्रिकेटपटू आहे आणि त्याने एक शानदार कृती केली. मी भारताचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांचे देखील आभार मानते. त्यांनी देखील मदतीसाठी प्रयत्न केले.”
विराट आणि अनुष्का सातत्याने करत आहेत मदत
दरम्यान, विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सातत्याने कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आयपीएल हंगाम मध्यातच स्थगित झाल्यानंतर विराट आपल्या घरी परतला होता. त्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी एक फंडरेझर सुरू केला होता. यात अनेकांना आर्थिक मदत करत आपला हातभार लावला. या फंडरेझर मार्फत जमा झालेला निधी त्यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिला आहे.
हेही वाचा-
–विराट, एबी, मॅक्सवेलला ७ चेंडूत बाद करणाऱ्या त्या युवा गोलंदाजाने सांगितला सामन्याआधीचा रितसर प्लॅन
–सेहवाग बनला कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन दूत, प्रसिद्ध केला हेल्पलाईन नंबर
–‘भारतीय संघात नक्की स्थान मिळेल, केकेआरच्याया खेळाडूने व्यक्त केला विश्वास