भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी करत दुसऱ्या डावात ५३९ धावांची धावांची आघाडी घेतली आहे. तसेच भारतीय सलामीवीरांनी देखील या सामन्यातील दोन्ही डावात चांगली सुरुवात करून दिली आहे. दरम्यान भारतीय सलामीवीर फलंदाजांच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. केएल राहुल आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मयांक अगरवाल आणि शुबमन गिल यांनी पहिल्या डावाची सुरुवात केली होती. दोघांनी मिळून ८० धावा जोडल्या होत्या. शुबमन गिल ४४ धावा करत बाद झाला होता, तर मयांक अगरवालने १५० धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान शुबमन गिलने १ षटकार मारला होता आणि मयांक अगरवालने ४ षटकार मारले होते.
भारताच्या दुसऱ्या डावात मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी डावाची सुरुवात केली होती. या डावात देखील मयांक अगरवालने १ षटकाराच्या मदतीने ६२ धावांची तुफानी खेळी केली होती. चेतेश्वर पुजाराने १ षटकाराच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे ही पहिलीच वेळ ठरली आहे, जेव्हा भारतीय संघातील दोन्ही डावात सलामीवीरांनीं किमान एकतरी षटकार मारला आहे.
दोन्ही डावात सलामीवीर फलंदाजांची जोडी ठरली हिट
या सामन्यातील दोन्ही डावात भारतीय सलामीवीर फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. पहिल्या डावात मयांक अगरवालने ३११ चेंडूंमध्ये १५० धावांची खेळी केली होती, तर शुबमन गिलने ७१ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी केली होती. या डावात भारतीय संघाला ३२५ धावा करण्यात यश आले होते.
दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा आणि मयांक अगरवाल यांची जोडी सलामी फलंदाजीसाठी मैदानावर आली होती. दुसऱ्या डावात देखील मयांक अगरवालने तुफानी खेळी करत १०७ चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळी केली होती, तर दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने ९७ चेंडूंमध्ये ४७ धावांची खेळी केली होती. या दोघांनी मिळून १०८ धावा जोडल्या होत्या.
भारताने दुसरा डाव ७० षटाकत ७ बाद २७६ धावांवर डाव घोषित केला आणि २६३ धावांच्या आघाडीसह न्यूझीलंडसमोर ५४० धावांचे आव्हान ठेवले.
महत्त्वाच्या बातम्या –
टेलरला बाद केलेल्या चेंडूवर सिराजने दिली प्रतिक्रिया; पाहा तो ‘ड्रीम बॉल’
मुंबई कसोटी जिंकण्याच्या वाटेवर असलेल्या टीम इंडियाला डबल झटका! दुखापतीमुळे २ खेळाडू मैदानाबाहेर
भारतीय फलंदाजांनी साधला अनोखा योगायोग; धावफलकावर पहिल्यांदाच दिसले ‘हे’ चित्र






