नवी दिल्ली। बीसीसीआयने रविवारी कोरोना विषाणूमुळे क्रिकेट सुरु करण्यासाठी राज्य संघटनांसाठी एक मानक प्रणाली प्रक्रिया (एसओपी) जारी केली आहे. या एसओपींमुळे राज्य क्रिकेट संघटनांना क्रिकेट पुन्हा सुरू करण्यास मदत होईल. परंतु सराव सुरु करण्यापूर्वी खेळाडूंना संमती फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागणार आहे.
बीसीसीआयने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता सराव करण्यासाठी सुविधांची तयारी, व्यायामशाळा प्रोटोकॉल, फिजिओथेरपी आणि वैद्यकीय प्रोटोकॉलसोबतच प्रोटोकॉलवर नजर ठेवण्यासाठी प्रशिक्षणाबाबतही १०० पानांची एसओपी जारी केली आहे. यामध्ये संमती फॉर्मचाही समावेश आहे. जिथे खेळाडूंना माहिती असले पाहिजे की, पुन्हा प्रशिक्षणास सुरुवात करणे धोकादायक आहे आणि खेळाडूंना जागोजागी प्रोटोकॉल आणि संघांद्वारे घेतल्या जाणाऱ्या खबरदारीबद्दल सांगण्यात आले आहे.
बीसीसीआय आणि राज्य संघटनांशी संबंधित प्रत्येक खेळाडूला हे देखील मान्य करावे लागेल की, आवश्यक खबरदारी घेतल्यानंतरही संघ धोका पूर्णपणे काढून टाकण्याची हमी देऊ शकत नाही. त्याचबरोबर प्रशिक्षण पुन्हा सुरु करण्याची इच्छा खेळाडूंवर अवलंबून आहे. अशामध्ये स्पष्ट आहे की, बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघांना कोणत्याही प्रकारे स्वत:वर कोणतेही संकट येऊ द्यायचे नाही. कोरोना व्हायरसशी संबंधित स्थितीवर पूर्णपणे नजर ठेवण्याबरोबरच बीसीसीआयने क्रिकेट पुन्हा सुरु करण्याशी संबंधित राज्य संघटनांशी आपले विचार मांडले आहेत.
एसओपीनुसार, भारतातील क्रिकेट खेळासाठीची प्रशासकीय समिती म्हणून बीसीसीआय ही जबाबदारी निश्चित करते की खेळाडू, कर्मचारी आणि सर्व भागधारकांचे आरोग्य व सुरक्षेसाठी योग्य प्रोटोकॉल लावले जातील. याव्यतिरिक्त ३८ राज्य संघातील खेळाडू आणि कर्मचार्यांना पुरुष आणि महिला गटात कमाई करण्यात मदत करते. बीसीसीआय प्रतिबंधात्मक उपायांवर कोणतीही तडजोड न करण्याचा प्रयत्न करेल.
बीसीसीआयने म्हटले आहे की, “बीसीसीआयशी संबंधित सर्व राज्य क्रिकेट संघटना या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करतील आणि कोविड- १९ च्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक अतिरिक्त उपाययोजना करु शकतात. तरीही क्रिकेट सुरु करण्यापूर्वी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. खेळाडू, कर्मचारी आणि भागधारकांचे आरोग्य आणि सुरक्षा ही संबंधित राज्य क्रिकेट संघटनांची जबाबदारी असेल.”