---Advertisement---

Video: लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर लंडनमध्ये भारतीय चाहत्यांनी धरला ‘सात समंदर पार’ गाण्यावर ठेका

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 12:21 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला होता. हा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मैदानात जोरदार जल्लोष करण्यात आला होता. यासह मैदानाच्या बाहेर देखील भारतीय क्रिकेट चाहत्यांनी बॉलिवुडच्या गाण्यावर ताल धरत जल्लोष साजरा केला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी (१६ ऑगस्ट)भारतीय गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला होता. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी फलंदाजी करताना ८९ धावांची भागीदारी केली होती. यानंतर गोलंदाजी करताना देखील २७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला भारतीय गोलंदाजांनी अवघ्या १२० धावांवर सर्वबाद केले होते. या विजयानंतर भारतीय चाहत्यांनी खास अंदाजमध्ये लंडनमधील लॉर्ड्स मैदानाच्या बाहेर सेलिब्रेशन केले होते.

भारतीय चाहत्यांनी लॉर्ड्स मैदानाच्या बाहेर हिंदी गाण्यावर ताल धरत विजयाचा जल्लोष साजरा केला होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय चाहते ‘सात समंदर पार’ या प्रसिद्ध हिंदी गाण्यावर जल्लोष साजरा करताना दिसून येत आहेत. या दरम्यान ट्रॅफिक पोलिस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. भारतीय चाहत्यांचा हा खास अंदाज सोशल मीडियावर पसंतीचा ठरतो आहे.(Indian fans celebrated lords victory on London’s Street,video went viral on social media)

 

भारतीय संघाने इंग्लंड संघावर मिळवला १५१ धावांनी विजय 
भारतीय संघाने दिलेल्या २७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलमीवीर फलंदाज लवकर माघारी परलते होते. त्यानंतर कर्णधार रूटने एकहाती झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला देखील मोठी खेळ खेळता आली नाही, तो अवघ्या ३३ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर जोस बटलरने शेवटी २५ धावांची खेळी केली. परंतु, त्याला देखील हा सामना वाचवता आला नाही. अखेर भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाजांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

पंजाबने तब्बल २२ कोटी खर्च केलेले खेळाडू उर्वरित आयपीएल २०२१ मधून बाहेर, ‘हा’ नवखा खेळाडू संघात सामील

“दोन्ही देशांतील संबंध सुधारल्यास भारतात जाणारा मी पहिला पाकिस्तानी असेल”

‘आमच्या संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे…’, टी२० विश्वचषकापूर्वी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---