---Advertisement---

क्रिकेटच्या पंढरीत विजयानंतर भारतीय चाहत्यांचा तुफान जल्लोष, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. भारतीय संघाने इंग्लंडला १५१ धावांच्या मोठ्या फरकाने धूळ चारत मालिकेमध्ये १-० ने आघाडी मिळवली. दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ केल्याने सामन्याचा निर्णय शेवटच्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात लागला. या विजयानंतर लॉर्ड्स मैदानाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून भारतीय चाहत्यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

लॉर्ड्स मैदानावर भारताचा तिसरा विजय
भारतीय संघाने लॉर्ड्स मैदानावर आजपर्यंत १९ कसोटी सामने खेळताना केवळ तीन विजय मिळवले आहेत. भारताने १९८६ मध्ये लॉर्ड्सवर प्रथमच कसोटी जिंकल्यावर २८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने २०१४ मध्ये आपला दुसरा विजय मिळवलेला. १९८६ मध्ये विश्वविजेते कर्णधार कपिल देव आणि २०१४ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली हे विजय मिळवले होते. त्यानंतर लॉर्ड्सवर विजय मिळवणारा विराट कोहली तिसरा भारतीय कर्णधार ठरला.

भारतीय चाहत्यांचा तो व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाच्या या संस्मरणीय विजयानंतर लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये भारताच्या विजयानंतर चाहते जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. या व्हिडिओला ‘भारताच्या विजयानंतर स्टॅंडमध्ये आनंद आणि जल्लोषाचे वातावरण होते.’ असे कॅप्शन दिले गेले आहे. सदर व्हिडिओमध्ये सर्व वयोगटातील भारतीय चाहते दिसत आहेत.

https://twitter.com/HomeOfCricket/status/1427651086190465027?s=19

सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताचा मोठा विजय
पहिला सामना अनपेक्षितरीत्या अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. पहिल्या डावात केएल राहुलने शतक झळकावून भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या नाबाद १८० धावांच्या खेळीच्या जोरावर २७ धावांची नाममात्र आघाडी मिळवली होती.

दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे व मोहम्मद शमी यांनी अर्धशतके झळकावत भारताला सामन्यात पुनरागमनाची संधी दिली. शेवटच्या दोन सत्रात भारतीय गोलंदाजांनी तुफान कामगिरी करत इंग्लंडचा डाव १२० धावांमध्ये गुंडाळून संघाला १५१ धावांनी मोठा विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘ही ६० षटकं इंग्लंडला नरकासारखी वाटली पाहिजेत’, विराटचा ‘तो’ व्हिडिओ घालतोय धूमाकुळ

इंग्लंड संघात अकरा नव्हे, तर दोनच खेळाडू खेळत होते, माजी भारतीय कर्णधाराची यजमानांवर बोचरी टीका

मोठ्या मनाचा विराट! विजयाच्या जल्लोषातही दाखवली खिलाडूवृत्ती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---