-अनिल भोईर
भारतीय पुरुष कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेत जोरदार सुरुवात केली आहे.
आशियाई स्पर्धेत कबड्डीची ही ८ वी वेळ असून आतापर्यंत मागील सात स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने ७ सुवर्णपदकासह आशियाई स्पर्धेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. १८ व्या आशियाई स्पर्धेत ११ पुरुष संघांनी सहभाग घेतला आहे.
पुरुष कबड्डी स्पर्धेची सुरुवात वर्ल्ड चॅम्पियन भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्याने झाली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत २०-१२ अशी आघाडी भारताकडे होती.
मध्यंतरापूर्वी बांगलादेशाने भारताला ऑल आऊट करत सामन्यात चुरस आणली होती. पण त्यानंतर अजय ठाकूर व मोनू गोयातने आक्रमक पवित्रा घेत सामन्यात आघाडी वाढवली. पकडीमध्ये दीपक हुडाने चांगला खेळ दाखवला.
पहिल्या सामनात भारताने सांघिक खेळ करत बांगलादेशचा ५०-२१ असा २९ गुणांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. ‘अ’ गटात दुसऱ्या सामन्यात कोरियाने ५२-२१ असा थायलंडचा पराभव केला.
‘ब’ गटात झालेल्या पहिल्या सामन्यात इराणने जपानवर ५५-२० असा सहज विजय मिळवत जोरदार सुरुवात केली आहे. पाकिस्तानने मलेशियाचा ६२-१७ असा पराभव केला.
पहिल्याच दिवशी भारताचा दुसरा सामना श्रीलंका विरुद्ध झाला. श्रीलंकाने आक्रमक खेळ करत सुरुवात केल्यामुळे भारत २-६ असा पिछाडीवर होता. त्यानंतर अजय ठाकुर व मोनू गोयातने पुन्हा एकदा चांगला खेळ करत भारताला मध्यंतरापर्यत २७-१३ अशी आघाडी मिळवून दिली.
मोहित चिल्लरच्या ४ पकडी तर संदीप व गिरीशच्या प्रत्येकी ३-३ पकडीच्या जोरावर भारताने ४४-२८ असा श्रीलंकावर विजय मिळवत स्पर्धेत आपला दुसरा विजय नोंदवला.
भारताचा पुढील सामना २० ऑगस्टला कोरिया विरुद्ध होणार आहे
आशियाई क्रीडा स्पर्धा (१९ ऑगस्ट)
पुरुष कबड्डी स्पर्धेचे सर्व निकाल:
१) भारत ५० विरुद्ध बांगलादेश २१
२) इराण ५५ विरुद्ध जपान २०
३) कोरिया ५२ विरुद्ध थायलंड २१
४) मलेशिया १७ विरुद्ध पाकिस्तान ६२
५) इंडोनेशिया ३३ विरुद्ध नेपाळ २९
६) भारत ४४ विरुद्ध श्रीलंका २८
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–आशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल
–आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
–विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…