भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. भारताने स्पर्धेत चमकदार कामगिरी करत स्पर्धेत अपाराजित राहिला. या दरम्यान, अशी अटकळ बांधली जात होती की कदाचित दोन महान भारतीय खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतात. मात्र, असे घडले नाही. स्पर्धेच्या समाप्तीनंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी स्पष्टपणे सांगितले की ते अद्याप निवृत्त होणार नाहीत.
रोहित आणि विराट निवृत्त होत नाहीत म्हणजे हे खेळाडू 2027 पर्यंत विश्वचषक खेळू शकतात. या स्पर्धेत अजून दोन वर्षे शिल्लक आहेत पण हे खेळाडू त्या स्पर्धेत दिसू शकतात. त्याच वेळी, 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारत कोणत्या देशांविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळेल आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा कधी खेळताना दिसतील हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना खूप उत्सुकता लागली आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारताच्या एकदिवसीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक कसे आहे ते जाणून घेऊयात.
जर आपण टीम इंडियाच्या वेळापत्रकावर नजर टाकली तर 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारताला अनेक देशांसोबत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. 2026 च्या अखेरीस भारतीय संघ एकूण 27 एकदिवसीय सामने खेळेल.
भारतीय संघाचे वनडे वेळापत्रक
ऑगस्ट 2025- भारताचा बांगलादेश दौरा (3 एकदिवसीय सामने)
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025- भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (3 एकदिवसीय सामने)
नोव्हेंबर-डिसेंबर 2025- दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा (3 एकदिवसीय सामने)
जानेवारी 2026- न्यूझीलंडचा भारत दौरा (3 एकदिवसीय सामने)
जून 2026- अफगाणिस्तानचा भारत दौरा (3 एकदिवसीय सामने)
जुलै 2026- भारताचा इंग्लंड दौरा (3 एकदिवसीय सामने)
सप्टेंबर-ऑक्टोबर 2026- वेस्ट इंडिजचा भारत दौरा (3 एकदिवसीय सामने)
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026- भारताचा न्यूझीलंड दौरा (3 एकदिवसीय सामने)
डिसेंबर 2026- श्रीलंकेचा भारत दौरा (3 एकदिवसीय सामने)