इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पाचव्या दिवशी(१६ ऑगस्ट) भारतीय गोलंदाजांचा बोलबाला होता. परंतु यावेळी गोलंदाजीने नव्हे तर फलंदाजीने. दुसऱ्या डावात अप्रतिम फलंदाजी करून माघारी परतल्यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते.
भारतीय संघाने पाचव्या दिवसाची(१६ ऑगस्ट) सुरुवात १५४ धावांच्या आघाडीसह केली होती. त्यावेळी रिषभ पंत आणि ईशांत शर्मा दोघेही फलंदाजी करत होते. रिषभ पंतकडून या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, तो ही अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. तो अवघ्या २२ धावा करत माघारी परतला होता. त्याच्या पाठोपाठ ईशांत शर्मा देखील १६ धावा करत माघारी परतला होता. त्यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला आणखी मजबूत स्थितीत पोहचवले.
जसप्रीत बुमराहने या सामन्यातील दुसऱ्या डावात ६४ चेंडूंचा सामना करत ३४ धावांची खेळी केली. तर मोहम्मद शमीने चौफेर फटकेबाजी करत ७० चेंडुंमध्ये नाबाद ५६ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ६ चौकार आणि १ षटकार लगावला होता. भारतीय संघाने २९८ धावांवर डाव घोषित केला. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये परतले होते, त्यावेळी कर्णधार कोहली आणि संघातील इतर खेळाडूंनी जोरदार स्वागत केले होते. या दोघांनी कठीण परिस्थितीत ८९ धावांची भागीदारी केली होती.(Indian players welcomes jasprit bumrah and mohammad shami after unbelievable partnership,watch video)
https://twitter.com/BCCI/status/1427246702394761222?s=19
इंग्लंड संघाची खराब सुरुवात
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिल्यानंतर आता गोलंदाजीमध्येही संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे.२७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिला. त्याने रॉरी बर्न्सला भोपळाही न फोडता माघारी धाडले होते. तसेच डोम सिब्लेला देखील मोहम्मद शमीने ० धावांवर माघारी धाडले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
एकटाच पुरेसा! इंग्लंडच्या खेळाडूंचा बुमराहशी पंगा, मग काय एकट्यानेच सगळ्यांना शिकवला धडा
दुर्देवी! पंतकडून लाखो चाहत्यांचा अपेक्षाभंग, इंग्लिश गोलंदाजांच्या चेंडूवर दिला सोपा झेल
दुर्देवी! पंतकडून लाखो चाहत्यांचा अपेक्षाभंग, इंग्लिश गोलंदाजांच्या चेंडूवर दिला सोपा झेल






