---Advertisement---

आयसीसी स्पर्धेत ‘मालिकावीर’ पुरस्कार जिंकणारे भारतीय खेळाडू; पाहा यादी

On: शनिवार, मार्च 8, 2025 10:52 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सहा ट्रॉफी आपल्या नावे केल्या आहेत. या विजयगाथेत अनेक खेळाडूंनी आपला ठसा उमटवला असून, संपूर्ण स्पर्धेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘मालिकावीर’ (Player of the Series) पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. चला तर मग, भारतीय संघाच्या आयसीसी विजयानंतर मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंच्या यशस्वी प्रवासावर एक नजर टाकूयात.

1983 क्रिकेट विश्वचषक- कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. या स्पर्धेत ‘मालिकावीर’ पुरस्कार दिला गेला नव्हता, परंतु कपिल देव यांच्या 175 धावांच्या खेळीची विशेष चर्चा झाली होती.

2007 टी20 विश्वचषक- महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. या स्पर्धेत इरफान पठाणला अंतिम सामन्यात ‘सामनावीर’ (Player of the Match) पुरस्कार मिळाला. पण मालिकावीर पुरस्कार शाहीद आफ्रिदीला देण्यात आला.

2011 वनडे विश्वचषक – महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा विश्वचषक जिंकला. या स्पर्धेत युवराज सिंगने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करत ‘मालिकावीर’ पुरस्कार पटकावला. या स्पर्धेत युवराज सिंंगने जवळपास 350+ धावा केल्या होत्या. तर गोलंदाजीत त्याने 15 विकेट्स घेतल्या होत्या. सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध युवराज सिंगची ती खेळी आजही चर्चेत आहे.

2013 चॅम्पियन्स ट्राॅफी – महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली होती. शिखर धवनने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ‘मालिकावीर’ पुरस्कार मिळवला होता. त्याने स्पर्धेत 5 सामन्यात 90.75 च्या सरासरीने एकूण 363 धावा केल्या होत्या. टीम इंडिया चॅम्पियन बनण्यात शिखर धवनची मोलाची कामगिरी होती.

2024 टी20 विश्वचषक- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत टीम इंडियाच्या जेतेपदात जसप्रीत बुमराहने मोलाची जबाबदारी स्वीकारली. त्याने संपूर्ण टीम इंडियाला मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून दिल्या त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन बनली. त्याच्या कामगिरीमुळे बुमरहाला मालिकावीर पुरस्कार मिळाला. त्याने स्पर्धेत एकूण 15 विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम साम्यात विराट कोहलीला सामनावीर पुरस्कार मिळाला, ज्यात त्याने 76 निर्णायक धावा केल्या होत्या.

हेही वाचा-

आयसीसीच्या फायनलमध्ये भारताचे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार विजेते; पाहा यादी
IPL 2025 साठी KKRचा मोठा निर्णय! माजी अष्टपैलू खेळाडूला प्रशिक्षकपदाची जबाबदारी
IND vs NZ: फायनलनंतर रोहित-विराट होणार निवृत्त? उपकर्णधाराचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---