fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय रेल्वे महिला संघाचे शिबिर पटना येथे होणार.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६६ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचा पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांकर बाग, पटना येथे ११ जुलै ते १४ जुलै २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

यास्पर्धेसाठी भारतीय महिला रेल्वे संघाच्या निवडीसाठी रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डकडून प्रशिक्षण सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १६ जून ते ९ जुलै २०१९ दरम्यान दक्षिण-पूर्व रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने खरागपूर, पटना येथे भारतीय रेल्वे महिला कबड्डी प्रशिक्षण शिबीर होणार आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत मागील तीन दशकापासून भारतीय रेल्वे महिला कबड्डी संघाचा दबदबा आहे. १९८४ पासून सलग विजेतेपद पटकवणाऱ्या रेल्वे संघाला ६५ व्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत हिमाचल प्रदेश संघाने पराभूत करून भारतीय रेल्वे महिला संघाच्या विजेतेपदाची परंपरा खंडीत केली. त्यानंतर रेल्वे संघाने तिसऱ्या फेडरेशन कप मध्ये अंतिम फेरीत हिमाचल प्रदेश संघाचा पराभव केला होता.

प्रशिक्षण सराव शिबिरासाठी रेल्वेच्या विभागातून ३० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या शिबिरातून अंतिम १२ खेळाडूंचा भारतीय रेल्वे महिला संघाची निवड करण्यात येईल.

सदर शिबिरात प्रशिक्षक म्हणून बनानी साहा (पूर्व रेल्वे)व जयश्री स्वैन (पूर्व-मध्य तट रेल्वे) या काम पाहतील. तर मंदार शेट्टी ट्रेनर आणि व्यवस्थापक जागी दक्षिण-पूर्व रेल्वे खरागपूर स्पोर्ट्स सेक्रेटरी राजेश हे काम पाहतील.

प्रशिक्षण सराव शिबिरासाठी निवडलेला संघ:
सोनाली शिंगटे (पश्चिम रेल्वे), नितु (पूर्व-मध्य तट रेल्वे), सत्या प्रिया (दक्षिण-मध्य रेल्वे), पायल चौधरी (दक्षिण-पूर्व रेल्वे), मीनल जाधव (पश्चिम रेल्वे), अपेक्षा टाकले (मध्य रेल्वे), रेखा सावंत (मध्य रेल्वे), रितू नेगी (दक्षिण-मध्य रेल्वे), सोनाली इंगळे (मध्य रेल्वे), पूजा राणी (पूर्व रेल्वे), सोनिका (पूर्व-मध्य रेल्वे), मोती चंदन (दक्षिण-मध्य रेल्वे), रुमा धारा (पूर्व रेल्वे), अंजु (उत्तर रेल्वे), पविथरा (दक्षिण-मध्य रेल्वे), रजनी कपिला (पूर्व-मध्य रेल्वे), खुशबू (उत्तर रेल्वे), सीना (पूर्व-मध्य रेल्वे), पिंकी रॉय (दक्षिण-मध्य रेल्वे), मोरेश्वरी (मध्य रेल्वे), पूजा (दक्षिण-मध्य रेल्वे), मोनिका देवी (उत्तर रेल्वे), ज्योती (पूर्व-मध्य रेल्वे), नेहा घाडगे (पश्चिम रेल्वे), रितू कुमारी (पूर्व-मध्य रेल्वे), नीलम (पूर्व-मध्य रेल्वे), सोनिया (पूर्व-मध्य रेल्वे), मनप्रित कौर (पूर्व-मध्य रेल्वे), शमा प्रवीण (पूर्व-मध्य रेल्वे), मधू (उत्तर रेल्वे)

You might also like