IND vs AUS FINAL: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आता 24 तासांपेक्षा कमी वेळ उरला आहे. रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणाऱ्या विश्वचषकाच्या महामुकाबल्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. अशात सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविषयी मन जिंकणारे भाष्य केले.
‘अंतिम सामन्यातही चांगले प्रदर्शन करू’
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने विश्वचषक 2023 (World Cup 2023 Final) स्पर्धेच्या अंतिम सामन्याविषयी बोलताना म्हटले की, “आम्ही या दिवसासाठी खूप आधीपासून तयारी केली होती. आम्ही टी20 विश्वचषक आणि डब्ल्यूटीसी अंतिम सामनाही खेळला होता. तिन्ही क्रिकेट प्रकारात आम्हाला योग्य खेळाडूंची निवड करायची होती. आम्ही मागील अडीच वर्षांपासून असे करत आलो आहोत. आम्ही प्रत्येकाला त्याची भूमिका स्पष्ट सांगितली आहे. यामुळे आम्हाला खूप मदत मिळाली आहे. या सर्वांमुळे आम्हाला आतापर्यंत मदत मिळाली आहे आणि आशा आहे की, आम्ही अंतिम सामन्यातही चांगले प्रदर्शन करू.”
राहुल द्रविडविषयी काय म्हणाला रोहित?
रोहितने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्याविषयी बोलताना म्हटले की, “द्रविड त्यांच्या काळात कसे क्रिकेट खेळले होते आणि मी कसे खेळत आहे, हे पाहिल्यावर समजते की, हे विरुद्ध आहे. या स्थितीतही ते जर मला अशाप्रकारे खेळू देत आहेत, तर ही मोठी गोष्ट आहे. आमच्या या प्रवासात राहुल द्रविडची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. आम्ही मागील वर्षी टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचलो होतो आणि हारलो होतो. त्यानंतर त्यांनी सर्व खेळाडूंना त्यांच्या भूमिकेविषयी सांगितले होते. त्यांनीही त्यांच्या काळात संघासाठी खूप काही केले आहे. तेही या ट्रॉफीचे हक्कदार आहेत. आता आम्हीही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ही वेळ आहे.”
‘माझ्यासाठी हा सर्वात मोठा क्षण’
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “भावनात्मकरीत्या ही सर्वात मोठी गोष्ट आहे, हा खूप मोठा खेळ आहे. मोठ्या अपेक्षा आहे. एक खेळाडू म्हणून आमच्यासाठी संधीविषयी विचार करण्याऐवजी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. होय, हे तुमच्या डोक्यात आहे. आम्ही यातून लपू शकत नाही. माझ्यासाठी, हा सर्वात मोठा क्षण आहे. माझा जन्म वनडे क्रिकेट पाहूनच झाला आहे.”
रोहितचे स्पर्धेतील प्रदर्शन
रोहित शर्मा विश्वचषक 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने साखळी फेरीतील 9 आणि उपांत्य फेरीतील 1 असे मिळून एकूण 10 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 55च्या सरासरीने 550 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 3 अर्धशतकांचाही पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वलस्थानी आहे. त्याच्या नावावर 28 षटकारांची नोंद आहे. (indian skipper rohit sharma press conference ahead icc world cup 2023 ind vs aus final)
हेही वाचा-
World Cup Final: टॉस जिंकलेल्या टीमने किती वेळा जिंकलाय विश्वचषक? पाहा आजपर्यंतचा रेकॅार्ड
‘भारताने पहिली बॅटिंग केली, तर संपलं सगळं…’, CWC 2023 Finalच्या एक दिवसाआधी दिग्गजाची भविष्यवाणी