---Advertisement---

CWC2023 । ‘सगळ्यांना माहीत आहे रे…’, ओळख करुन देताच रोहितचा जोक

Rohit Sharma in press conference
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महामुकाबला सुरू होण्याला 24 तासांपेक्षा कमी वेळ बाकी आहे. वनडे विश्वचषक 2023चा हा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा मजेशीर प्रतिक्रिया समोर येत आहे.

रोहित शर्मा () याच्या नेतृत्वातील भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023 मध्ये एकाही सामना पराभूत झाला नाहीये. रविवारी भारतीय संघ स्पर्धेतील सलग 11वा आणि सर्वात महत्वाचा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. त्याआधी शनिवारी (18 नोव्हेंबर) सायंकाळी रोहित शर्मा याची पत्रकार परिषद पार पाडली. यावेळी प्रेजेंटर नेहमीप्रमाणे ओपचारीक नियम समजावून सांगताना दिसला. प्रेजेंटरने “आपल्यासोबत रोहित शर्मा आहे,” असे म्हणताच कर्णधाराची खास प्रतिक्रिया पाहायला मिळाली.

रोहित शर्मा पत्रकार परिषदेत नेहमीच आपल्या हटके उत्तरांसाठी चर्चेत असतो. अहमदाबादमध्येही त्याने असेच काहीसे केले. प्रजेंटर रोहितविषयी सांगताना रोहितने त्याला थांबवत “हे सर्वांना माहीत आहे यार,” असे म्हटले. पत्रकार परिषदेतील रोहितची ही प्रतिक्रिया सथ्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) दुपारी दोन वाजता सुरू होईल. उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडला 70 धावांनी मात दिली होती. तर ऑस्ट्रेलियन संघाने 3 विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा उपांत्य सामना जिंकला होता. अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे तुल्यबळ संघ आमने सामने आहेत. अशात ही लढत चांगलीच घासून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Rohit taunted to presenter in Press Conference )

महत्वाच्या बातम्या – 
श्रेयस अय्यरच्या सुंदर प्रेयसीचा खुलासा झालाच! फायनलसाठी मैदानात हजेरी लावण्याची शक्यता
काय होतास तू काय झालास तू! इम्रान खान सोडून WC Finalसाठी सर्व विश्वविजेते कॅप्टन लावणार हजेरी, कारण धक्कादायक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---