वनडे विश्वचषकात श्रेयस अय्यर भारतासाठी महत्वाचा फलंदाज ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अय्यर अपेक्षित खेळी करू शकला नव्हता. पण मागच्या चार सामन्यांमध्ये त्याची खेळी संघासाठी अतिशय महत्वाची ठरली. विश्वचषकारम्यान, भारतीय संघाला चीयर करणाऱ्यांमध्ये एक मिस्ट्री गर्ल दिसली, जिच्याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार स्टॅन्डमध्ये भारतीय खेळाडूंच्या पत्नींसोबत बसणारी ही मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नसू श्रेयस अय्यर याची प्रेयसी आहे. श्रेयस अय्यर विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार खेळी करत असताना स्टॅन्डमधून ही मिस्ट्री गर्ल त्याला चीअर करताना दिसली आहे. ही श्रेयसची प्रेयसी असल्याचे अध्याप अधिकृतपणे समोर आले नाहीये. पण माध्यमांमध्ये तसा अंदाज बांधला जात आहे. माहितीनुसार या मिस्ट्री गर्लचे नाव त्रीशा कुलकर्णी आहे.
त्रीशा विश्वचषकातील प्रत्येक सामन्यासाठी मैदानात उपस्थित होती. अंतिम सामन्यात देखील ती नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हजेरी लावू शकते. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याआधी दिवाळी पार्टीमध्येही त्रीशा आणि अय्यर एकत्र दिसले होते. तसेच दोघांनी एकत्र काढलेले अनेक फोटो सध्या समोर येत आहेत. सोशल मीडियावर हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
???????? Shreyas Iyer girlfriend revealed
God bless them ????#ShreyasIyerpic.twitter.com/AIDuQH6qmB
— Shreyas Iyer (@SIXOVERPOINT) November 12, 2023
दरम्यान, अय्यरचे विश्वचषकातील प्रदर्शन पाहिले, तर त्याने 10 सामन्यांमध्ये 526 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. भारतासाठी विश्वचषकाच्या चालू हंगामात अय्यर तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मागच्या दोन सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे 128* आणि 105 धावांची अप्रतिम खेळी केली आहे. अंतिम सामन्यात देखील त्याच्याकडे अशाच प्रकारच्या शतकाची अपेक्षा चाहते करत आहेत. (Shreyas Iyer girlfriend revealed see her photos)
महत्वाच्या बातम्या –
काय होतास तू काय झालास तू! इम्रान खान सोडून WC Finalसाठी सर्व विश्वविजेते कॅप्टन लावणार हजेरी, कारण धक्कादायक
काय होतास तू काय झालास तू! इम्रान खान सोडून WC Finalसाठी सर्व विश्वविजेते कॅप्टन लावणार हजेरी, कारण धक्कादायक