भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर मैदानावर अगदी कडक स्वरूपात जरी नजर येत असले तरी , सोशल मीडियावर मात्र त्यांच्या पोस्ट चर्चेत असतात. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना झाला आहे. तसेच यादरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर दुबईमध्ये एका हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना दिसून आले.
भारतीय संघाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी भारतीय संघासमोर पाकिस्तान संघाच आव्हान असेल, भारत विरुद्ध पाकिस्तान महासामना चांगलाच रंगताना दिसून येईल. पण त्याआधी दुबईत गौतम गंभीर गुलाबजामुन चा आनंद घेताना दिसले आहेत.
गौतम गंभीर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून हा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील नाजुक हास्यातून दिसून येत आहे की त्यांना गुलाबजामुनचा स्वाद आवडला असेल. त्यांनी फोटोला कॅप्शन देत म्हटले आहे की, “आयुष्य लहान आहे त्यामध्ये गोडवा आणुया ”
गौतम गंभीरच्या या पोस्टवर भारतीय संघाचे माजी क्रिकेटर युवराज सिंग आणि इरफान पठाण यांनी कमेंट केली आहे. इरफानने कमेंट मध्ये म्हणले आहे की, “भाऊ हे डाळ- भाता नंतर आहे का” भारत देशामध्ये नेहमीच लोक जेवणानंतर गोड खातात. त्यानंतर युवराज सिंगने कमेंट मध्ये प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, गौतम गंभीर जर “आयुष्य लहान आहे तर तु पण थोडं हसलं पाहिजे.” गौतम गंभीरच्या सोशल मीडिया अकाउंटवर आईस्क्रीम खाल्ल्याचे आणि अजून काही पंचपक्वनांचा आनंद घेतानाचे फोटो आहेत.
भारतीय संघ 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 फेब्रुवारी रोजी दुबईकडे रवाना झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे . पण भारतीय संघाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे .भारतीय संघाला हायब्रीड मॉडेल लागू असल्याने भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत, तसेच बाकीचे सर्व सामने पाकिस्तान मध्ये खेळले जाणार आहेत.
हेही वाचा
RCB vs DC; स्म्रीती मानधनाचे शानदार अर्धशतक! आरसीबीचा धमाकेदार विजय
चॅम्पियन्स ट्रॉफी धोक्यात? दहशतीच्या सावटाखाली क्रिकेट महोत्सव!
विराट कोहली की एबी डिव्हिलियर्स, चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये कोणाचे वर्चस्व? पहा आकडेवारी