टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) पुरुष तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने यावेळी सपाटून मार खाल्ला असून दक्षिण कोरिया संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
या सामन्यात दक्षिण कोरिया संघाने भारतीय संघाला ६-० ने पराभूत करत विजयी पताका फडकवली. या भारतीय संघात अतनू दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय यांचा समावेश होता. (Indian team of Atanu Das, Pravin Jadhav & Tarundeep Rai LOSE to South Korea 0-6 in Men’s Team event)
It's curtains for the #IND Men's Archery Team. They lost to #KOR 6-0 in the quarter-final 🏹#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion https://t.co/iebVRTkuGl
— Olympic Khel (@OlympicKhel) July 26, 2021
तत्पूर्वी झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष तिरंदाजी संघाने आपल्या दमदार कामगिरीने कझाखस्तानचा धुव्वा उडवला होता. यात भारतीय संघातील अतनू दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय यांनी कझाखस्तानला ६-२ ने मात दिली होती.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ