भारतीय संघासाठी हे 2025 वर्ष अपेक्षेप्रमाणे सुरू झाले नसले तरी त्यांना या वर्षातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धेत, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळायचे आहे. जे 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली खेळले जाईल. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधील त्यांचे सर्व सामने पाकिस्तानऐवजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळेल. जर भारत अंतिम किंवा उपांत्य फेरीत पोहोचले तर भारतीय संघ आपले सामने याच मैदानावर खेळेल. दुबईच्या मैदानावर भारतीय संघाचा आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये एक उत्तम विक्रम आहे. ज्यामध्ये त्यांना एकदिवसीय सामन्यात एकदाही पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. अशा परिस्थितीत, सर्व चाहत्यांना भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला विक्रम कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. टीम इंडियाने 18 सप्टेंबर 20218 रोजी या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना हाँगकाँग संघाविरुद्ध खेळला, जो त्यांनी 26 धावांनी जिंकला. टीम इंडियाचा या ठिकाणी पाकिस्तानविरुद्ध अजिंक्य रेकॉर्ड आहे.
टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. त्यापैकी एका सामन्यात त्यांनी 163 धावांचा पाठलाग करताना 8 विकेट्सने विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 9 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या मैदानावर एकदिवसीय आणि टी20 सामन्यांसह एकूण 15 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 10 सामने जिंकण्यात यश आले आहे. तर 4 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
जर आपण भारतीय संघाच्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या वेळापत्रकावर नजर टाकली तर संघाचा ग्रुप-ए मध्ये पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांग्लादेश विरुद्ध खेळायचा आहे, तर पाकिस्तान विरुद्ध 23 फेब्रुवारी रोजी आणि शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध आहे. जो की 2 मार्चला खेळवला जाईल.
हेही वाचा-
SA20: 28 वर्षीय खेळाडूचा पहिल्याच सामन्यात जलवा, मलिंगा-बुमराच्या खास क्लबमध्ये प्रवेश
‘अनादरपूर्ण वागणूक आणि अपमान…’, आर अश्विनच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटपटूची खळबळजनक प्रतिक्रिया
Champions Trophy; इंग्लंडनंतर आता आफ्रिकेची अफगाणिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी