---Advertisement---

विजयी भव! केपटाऊन कसोटीत कर्णधार विराटची बॅट ओकणार आग, विजयासाठी टीम इंडियाची तयारी सुरू

On: सोमवार, जानेवारी 10, 2022 4:04 PM
Team-India-Practising
---Advertisement---

भारतीय संघ (Indian team) सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे (India tour of South Africa). दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार पुनरागमन करत मोठा विजय मिळवला होता. ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा निर्णायक कसोटी सामना असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू जोरदार सराव करताना दिसून येत आहेत, ज्याचे फोटो बीसीसीआयने (Bcci) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Indian team preparation for third test)

बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. या फोटोमध्ये ईशांत शर्मा (Ishant Sharma) नेट्समध्ये सराव करताना दिसून येत आहे. ज्यामुळे अंदाज व्यक्त केला जात आहे की, दुखापतग्रस्त असलेल्या मोहम्मद सिराजच्या जागी ईशांत शर्माला किंवा उमेश यादवला (Umesh Yadav) आगामी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते.

भारतीय कर्णधाराचे होणार जोरदार पुनरागमन 
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर भारतीय संघातील खेळाडूंचे सराव करत असतानाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून, “आम्ही या सुंदर केपटाऊनमध्ये आहे. भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्याची तयारी सुरू केली आहे.” असे लिहिले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून येणार आहे. तोही संघातील इतर खेळाडूंसोबत सराव करतो आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान तो पाठीच्या दुखण्यामुळे संघाबाहेर झाला होता. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलने (Kl Rahul) संघाचे नेतृत्व केले होते.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विराट कोहली (Virat Kohli)  शिवाय मैदानात उतरला होता. त्यामुळे विराट कोहली या सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्याला गेल्या २ वर्षांपासून एकही सामन्यात शतक झळकवता आले नाहीये. ज्यामुळे आगामी कसोटी सामन्यात विराट कोहली शतक झळकावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा सामना ११ ते १५ जानेवारी दरम्यान केपटाऊनच्या मैदानावर रंगणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Video: शेवटच्या कसोटीपूर्वी रॅास टेलर भावुक, राष्ट्रगीत सुरू असताना अश्रू अनावर

पंतवर टीकेचा भडिमार सुरूच! गावसकर, मदललाल यांच्यानंतर ‘हा’ दिग्गज संतापला

हे नक्की पाहा:

सचिनच्या सल्ल्याने पालटली कारकीर्द पण सचिनमुळेच जगभर ट्रोल झालेला Lord Thakur |  Sachin Tendulkar

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---