भारतीय खेळाडू हे त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत असतातच पण त्याहून जास्त चर्चा होते ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची. संघातील खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज हिचाही समावेश आहे. भारतीय खेळाडू जेमिमा ही प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जाणीवपूर्वक वापर करते. क्रिकेट सामना नसेल तर जेमिमा फिरायला बाहेर जाते तेव्हा तीचे फोटो देखील शेअर करत असते. नुकताच तीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे. चला तर पाहू जेमिमाच्या या व्हिडित आहे तरी काय?
भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) तिच्या कामगिरीमुळे चर्चेत असतेच. ती भारतीय संघाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मैदानावर चांगली कामगिरी करण्यासोबतच ती गायनातही पारंगत आहे. तिचे गातानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडेच तिने बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) याच्यासोबत एक गाणेही गायले आहे. ‘यादा तेरिया मेरिया’ असे त्या गाण्याचे नाव आहे.
जेमिमाने अपारशक्तीसोबत गायलेले गाणे तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. तिचा आवाज चांगला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेमिमाच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या व्हिडिओला 60 हजारपेभा जास्त लाइक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहे. जेमिमाने या व्हिडिसोबत खास कॅप्शन देखील दिले आहे. व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत. एका चाहत्याने ‘रिटायरमेंट नंतरचा प्लॅन तयार आहे’, अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली.
https://www.instagram.com/reel/CoeOIwKtCgg/?utm_source=ig_web_copy_link
जेमिमाची गिटार नेहमी तिच्या सोबतच असते. भारतीय संघासोबत परदेश दौरा करतानाही ती गिटार सोबत नेते. काही दिवसांपूर्वी तिने स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरून असाच एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात ती स्वतः गिटार वाजवात आहे आणि सोबतच गाणे देखील गात आहे. महिला क्रिकेट संघाच्या बसमधीला हा व्हिडिओ आहे.
https://www.instagram.com/p/CkSp17MPf8H/?utm_source=ig_web_copy_link
सध्या भारतीय महिला संघ आयसीसी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांसोबतच्या सामन्याने त्यांच्या विश्वचषकाची सुरुवात करतील. रविवारी (12 फेब्रुवारी) पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात जेमिमाची प्लेइंग इलेव्हनमधील जागा जवळपास पक्की मानली जात आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय महिला
शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, ऋचा घोष, रेणुका ठाकूर, राजेश्वरी गायकवाड,
पाकिस्तान महिला
मुबीना अली, सिदरा अमीन, बिस्माह मारूफ (कर्णधार), निदा दर, आयेशा नशीम, आलिया रियाज, ओमाइया सोहेल, कायनात इम्तियाज, फातिमा सना, तुबा हसन, नशारा संधू. (indian-women-cricket-team-t-20-ind-vs-pak-jemimah-rodrigues-viral-video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताला मोठा झटका, स्म्रिती मंधानाला गंभीर दुखापत
टी20 विश्वचषकात विजयी सुरुवात करण्यासाठी टीम इंडिया आतुर, पहिल्या सामन्यात पाकिस्तानचे आव्हान