---Advertisement---

दु:खद! कोरोनामुळे ‘या’ भारतीय महिला क्रिकेटपटूच्या आईचे निधन, बहिणही संक्रमित

On: रविवार, एप्रिल 25, 2021 8:12 AM
---Advertisement---

सध्या जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून यामध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटींपासून सर्वांनाच कठिण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये अजून एक दुखःद घटना घडल्याचे सांगितले जात आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिची आई चेलूवंबदा देवी यांचे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. स्वतः वेदा कृष्णमूर्तीने ट्विट करत या दुखःद घटनेची माहिती दिली आहे.

भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदिवसीयमध्ये 48 आणि टी-20 मध्ये 76 सामने खेळणाऱ्या या महिला क्रिकेटपटूने ट्वीटद्वारे आपल्या आईच्या निधनाची दुःखद वार्ता सांगत स्वतःचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याचेही सांगितले आहे. परंतु तिची बहिणही कोरोना संक्रमित झाली असल्याचे तिने सांगितले आहे.

28 वर्षीय वेदाने ट्विटरवर लिहिले की, “आईच्या निधनानंतर मला पाठवलेल्या संदेशांचा मी आदर करते. आपणास माहिती आहे की आईशिवाय मी माझ्या परिवाराचा विचारच करू शकत नाही. त्यामध्ये माझी बहिणही कोरोना संक्रमित असून ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करा. सध्या माझा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. परंतु अशा परिस्थितीतून जाणाऱ्या लोकांबद्दल मी संवेदना व्यक्त करते.”

या महिला क्रिकेट खेळाडूच्या कारकीर्दीबाबत बोलायचे झाले तर, वेदाने 48 एकदिवसीय सामन्यात 829 धावा केल्या आहेत. त्यामध्ये आठ अर्धशतके आपल्या नावे केली आहेत. त्याबरोबरच तीन बळीही घेतले आहेत. तर तिने 76 टी-20 सामने खेळले असून यामध्ये तिने 2 अर्धशतकांसह 875 धावा केल्या आहेत. तसेच ती घरगुती क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्वही करते.

महत्त्वाच्या बातम्या-

सकारियाने हवेत उडी मारत टिपला अविश्वसनीय झेल, मग भन्नाट सेलिब्रेशन करत वेधले सर्वांचे लक्ष; बघा व्हिडिओ

कमिन्सचा जोरदार बाउन्सर आदळला बटलरच्या हेल्मेटवर, थांबवावा लागला सामना; पाहा तो क्षण

‘चेन्नईची खेळपट्टी बकवास’, राजस्थानच्या खेळाडूने उघडपणे व्यक्त केली नाराजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---