टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) भारतीय महिला हॉकी संघाने देशाची मान उंचावली आहे. भारत विरुद्ध आयर्लंड महिला संघात पूल ए मधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने दमदार पुनरागमन करत १-० ने विजय मिळवला. या स्पर्धेतील पहिलाच विजय आहे. त्याचबरोबर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्याच्या आशा कायम आहेत.
या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला एकापाठोपाठ एक पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. मात्र, त्यांना सुरुवातीला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे पहिला हाफ हा शून्य गोलच्या बरोबरीत राहिला. (Indian women’s hockey team beats Ireland 1-0 in Pool A match)
त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या दोन मिनिटात भारताला सलग ५ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्यातील एकाही पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये करता आले नाही.
Our first win of the Tokyo Olympics. 🇮🇳
We keep dreaming and stay in contention for the Quarter-Finals. 💙💪#IREvIND #HaiTayyar #IndiaKaGame #TeamIndia #Tokyo2020 #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/zuZeELYxOr
— Hockey India (@TheHockeyIndia) July 30, 2021
विशेष म्हणजे, तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाला गोल करता आला नाही. यावेळी भारताने एकूण १७ वेळा आयर्लंड महिला संघाविरुद्ध गोल करण्याचा प्रयत्न केला. तसेच १४ पेनल्टी कॉर्नरही मिळवले. मात्र, ३८ मिनिटांच्या खेळानंतरही दोन्ही संघ शून्य गोलवर होते.
चौथा क्वार्टर सुरू झाल्यानंतरही दोन्ही संघ शून्य गोलवर होते. हा चौथा क्वार्टर दोन्ही संघांसाठी करो या मरो सारखा होता. तरीही, पहिल्या ३ मिनिटात ते गोल करण्यात अयशस्वी झाले.
भारताची परिस्थिती पाहून सर्वांना वाटत होते की, शेवटच्या ३ मिनिटात गोल न होता अनिर्णित होऊन भारतीय महिला हॉकी संघाचा हा प्रवास इथेच होईल. मात्र, त्यावेळीच मोठा चमत्कार झाला. भारतीय महिला हॉकीपटू नवनीत कौरने आयर्लंडच्या गोलपोस्टच्या बाहेर मिळालेल्या संधीचा फायदा घेत गोल केला आणि १-० असा स्कोर केला.
आता भारतीय महिला संघ शनिवारी (३१ जुलै) दक्षिण आफ्रिका महिला हॉकी संघाचा सामना करेल. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आणि आयर्लंड संघाला ग्रेट ब्रिटन संघाकडून पराभव मिळाला, तर भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-