१९ ऑगस्ट २०२०पासून भारतीय महिला हॉकी संघ सात्यताने कोणत्या-ना-कोणत्या क्रिडाविषयक सत्रात सहभागी होत आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीत बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. अशात भारतीय महिला हॉकी संघाकडून ८० सामने खेळलेल्या डिफेंडर गुरजीत कौरने मोठे वक्तव्य केले आहे.
ती म्हणाली की, “जेवढी जास्त सत्रे होत आहेत, तेवढा खेळाडूंचा आत्मविश्वासही वाढत आहे. याचा आम्हाला भविष्यात खूप फायदा होणार आहे. आम्हा सर्वांसाठी कोरोना व्हायरसदरम्यानचा हा काळ खूप कठीण होता. पण वेळोवेळी हॉकी इंडियाने आम्हाला हव्या त्या गोष्टी पुरवल्याबद्दल त्यांचे आभार. हॉकी इंडिया आणि एसएआयने उच्च श्रेणीच्या सुरक्षा उपायांपासून ते सुविधांपर्यंत सर्व गोष्टीत आम्हाला खूप मदत केली आहे.”
ऑलिंपिकच्या तयारीविषयी बोलताना २५ वर्षीय गुरजीत म्हणाली की, “गतवर्षी आम्ही बऱ्याच टॉप प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध दमदार प्रदर्शन केले आणि एफआयएच महिला सीरिजसारखी स्पर्धा जिंकली. यामुळे संघातील खेळाडूंमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आमच्या त्या सर्व सकारात्मक गोष्टींना ध्यानात घेऊन आम्ही ऑलिंपिकच्या तयारीला लागलो आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या-
नुकताच कोरोनातून बरा झालेला खेळाडू म्हणतोय, “आता लागतो ‘या’ गोष्टीच्या तयारीला”
आनंदाची बातमी! हरियाणातील छोट्या गावात बनणार आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैदान, ‘हा’ खेळाडू झाला खूश
‘या’ दोन खेळाडूंमुळे भारतीय महिला हॉकी संघ घडवू शकतो इतिहास: धनराज पिल्ले
ट्रेंडिंग लेख-
गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…
प्रतिभेला संधी हीच तर आयपीएलची खासियत.! एकेकाळचा बॉल बॉय आज बनलाय संघाचा आधार
दिल्लीला आयपीएल चषक जिंकायचा असेल, तर ‘या’ ३ गोष्टींकडे द्यावे लागले लक्ष